crime news : माजी सरकारी वकीलाने मागितली चार कोटींची खंडणी, जीवे मारण्याची दिली धमकी

crime news : राज्यात गाजलेल्या खटल्यातील माजी सरकारी वकीलावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी वकील, त्यांचा मुलगा आणि अन्य तिघांवर खंडणी, जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षीदारास धमकवत साक्ष मागे घेण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप त्यांचावर आहे.

crime news : माजी सरकारी वकीलाने मागितली चार कोटींची खंडणी, जीवे मारण्याची दिली धमकी
ad pravin chavan
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 3:31 PM

किशोर पाटील, जळगाव | 18 नोव्हेंबर 2023 : राज्यात गाजलेल्या खटल्यातील माजी सरकारी वकीलावर चार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. साक्षीदारला धमकी देऊन चार कोटी रुपयांची मागणी केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. तुला जिवंत रहायचे असेल तर ॲड. प्रवीण चव्हाण यांना न्यायालयाच्या खर्चासाठी चार कोटी द्यावे लागतील, अशी धमकी दिली गेली. या प्रकरणी माजी सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण, त्यांचा पुत्र आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ नोव्हेंबर रोजी आणि त्यापूर्वी एकदा हा प्रकार घडला होता.

काय आहे प्रकरण

ॲड. प्रवीण चव्हाण हे माजी सरकारी वकील आहे. माजी आमदार सुरेश जैन यांच्याविरोधातील घरकुल खटल्यात ते सरकारी वकील होते. त्यामुळे ते राज्यभरात प्रसिद्ध झाले. त्यांनी इतर मोठ्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा प्रयत्न केलाचा आरोप आहे. जळगावातील गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या वादात ॲड. प्रवीण चव्हाण एका गटाच्या बाजूने होते. त्यामुळे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील पेंन ड्राईव्ह बॉम्ब विधानसभेत मांडला होता. गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट असल्याचा आरोप फडवणीस यांनी विरोधी पक्षनेते असताना सभागृहात केला होता. या प्रकरणात तेजस मोरे हा साक्षीदार होता.

हे सुद्धा वाचा

तेजस मोरे यांच्यावर दबाब

ॲड. प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. सुमारे दीड महिन्यांपूर्वी तेजस मोरे मुंबईवरुन पुणे जात होते. त्यावेळी त्यांच्या वाहनास तिघांनी अडवले. तुला जिवंत रहायचे असेल तर ॲड. चव्हाण यांना न्यायालयाच्या खर्चासाठी चार कोटी दे, नाही तर तुला जिवे ठार मारले जाईल, अशी धमकी दिली होती. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी पुन्हा मोरे यांना अशीच धमकी देण्यात आली. यामुळे मोरे यांनी जळगाव येथील जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून ॲड. प्रवीण चव्हाण, त्यांचा मुलगा अन्य तिघांवर भादंवि कलम ३२३, ३८७ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.