AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी साधा खिलाडी नाही की मला कुणी डिवचू शकेल, अब्दुल सत्तार यांनी कुणाला डिवचलं?

लोकसभा हरले म्हणजे त्यांचं राजकारण संपलं असं होत नाही. राजकारण वादविवादाचे नसावे असे आमच्या जावई लागणाऱ्यांना सांगायचं आहे.मी महायुतीचा धर्म पाळावा त्यांनीही महायुतीचा धर्म पाळावा, मी बोलण्यात, वागण्यात, राहण्यात आचारसंहिता पाळायला पाहिजे त्यांनी युतीचा धर्म पाळावा असा सल्ला अब्दुल सत्तार आपल्या सहकारी पक्षाती नेत्यांना दिला आहे.

मी साधा खिलाडी नाही की मला कुणी डिवचू शकेल, अब्दुल सत्तार यांनी कुणाला डिवचलं?
Follow us
| Updated on: Feb 17, 2025 | 7:34 PM

रावसाहेब दानवे यांना मी विनंती करणार निवडणूक संपली आता सोडून द्यावं. प्रत्येक वेळी ते माझ्या विरोधात बोलणार मी त्यांच्या विरोधात बोलणार, हे काही योग्य नाही, दोघांनीही आचारसंहिता पाळली पाहिजे असे शिवसेनेचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. रावसाहेब दानवे माझे दाजी मी त्यांचा दाजी आम्ही मित्र पण आहोत, दाजी भावोजी नाराज आहेत. रावसाहेब दानवे यांनी राजकारणातील काही आचारसंहिता पाळायला पाहिजे. टोप्याच्या राजकारणापेक्षा आपल्या मतदार संघाचा विकास कसा होईल हे पहिले पाहिजे. मुख्यमंत्री महोदय, रावसाहेब दानवे, एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचे पालन करावे असाही सल्ला सत्तार यांनी दिला आहे.

मी इतका मोठा पुढारी नाही की रावसाहेब दानवे यांचा पराभव करीन पण त्यांचा कुणीतरी गैरसमज करून देतो, गैरसमज करून ही मंडळी राजकिय पोळी शेकून घेतात. लोकांमध्ये विष पेरण्याचे काम केले, कामापेक्षा जातीचे मूल्यमापन जास्त केले जाते. मी रावसाहेब दानवे यांना काही बोलू शकेन इतका मोठा मी नेता नाही. रावसाहेब दानवे यांच्याबाबत फार मोठा वाद करण्याचा माझा काहीही हेतू नाही असे सांगतानाच येणाऱ्या झेडपी महापालिका निवडणूकीत आमचे नेते सांगतील त्या पद्धतीने काम करू असेही अब्दुस सत्तार यांनी म्हटले आहे.

अडीच वर्षानंतर मला संधी देतील

संजना जाधव यांच्यासाठी मी सर्वांना फॉर्म काढायला लावून मदत केली, पण ते बोलतात त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही, मी त्यांच्या विरुद्ध गेलो नाही, एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते केलं बाकी मला कुणाच्या लायसन्सची गरज नाही. मी स्वतःच आता सिल्लोड विधानसभा लढणार नाही. मंत्रिपद भेटलं नाही. याची खंत वाटत नाही. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस बोलले होते की आम्ही काही लोकं (मंत्री) बदलणार आहोत, मला असं वाटतं की अडीच वर्षानंतर मला काम करण्याची संधी देतील असेही सत्तार यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

शिरसाठ यांनी 10 वर्ष पालकमंत्री राहावं

संजय शिरसाठ यांनी 10 वर्ष पालकमंत्री राहावं मला काही त्याचं घेणं देणं नाही, मी साधा खिलाडी नाही की मला कुणी डिवचू शकेल. काही लोक माझ्याविरुद्ध षड्‍यंत्र करीत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. मला कुणीही एकटा पाडलं तरी मी एकटा पडत नाही, मला त्याची चिंता नाही. संजय शिरसाठ साहेबांनीही असा कुठलाही निर्णय घेतला नाही की कटुता निर्माण होईल. रावसाहेब दानवे यांना एक सांगायचे आहे की, राजकारणात काही गोष्टी घडतात त्या एकच व्यक्ती करू शकत नाही, वादविवाद करून काही होऊ शकत नाही, त्यांनी माझी देवेंद्रजी किंवा एकनाथ शिंदेंकडे तक्रार करावी त्यांच्याकडेही याबाबत चर्चा होऊ शकते असेही यावेळी सत्तार यांनी मनमोकळं करताना सांगितलं..

पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...