Supriya Sule : फडणवीस मुख्यमंत्री होताच सुप्रिया सुळेंनी लाडक्या बहिणींसाठी त्यांच्याकडे मागितली एक गोष्ट

Supriya Sule : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला आहे. काल त्यांचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनताच खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याकडे एक मागणी केली आहे. शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला त्यांच्या एका आश्वासनाची आठवण करुन दिली आहे.

Supriya Sule : फडणवीस मुख्यमंत्री होताच सुप्रिया सुळेंनी लाडक्या बहिणींसाठी त्यांच्याकडे मागितली एक गोष्ट
Supriya SuleImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 06, 2024 | 11:10 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काल 12 दिवसांनी सरकार स्थापन झालं. 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी झाला. महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ ठरल्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे गेलं. विधानसभा निवडणुकीत भाजपचे 132 आमदार निवडून आले. त्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपला मिळालं. देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्र राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तशी देवेंद्र फडणवीस यांची शपथ घेण्याची तिसरी वेळ आहे. 2014 ते 2019 पहिला कार्यकाळ होता. 2019 साली फक्त 80 तास हा त्यांचा दुसरा कार्यकाळ राहिला. आता 5 डिसेंबरपासून त्यांचा तिसरा कार्यकाळ सुरु झाला आहे. त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाला होता. 48 पैकी त्यांचे फक्त 17 खासदार निवडून आले होते. सहा महिन्यात विधानसभा निवडणुकीला चित्र बदललं. त्यामागे एक प्रमुख कारण होतं, लाडकी बहिण योजना. महायुती सरकारने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कल्याणकारी योजना आणल्या. पण त्यात सर्वात प्रभावी ठरली, लाडकी बहिण योजना. या लाडक्य बहिण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतात. महायुती सरकारे त्यासाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लाडक्या बहिणीच यश पाहून महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यातून महिन्याला खात्यात 3 हजार रुपये जमा करण्याच आश्वासन दिलं होतं.

त्याच आश्वासनाची आठवण करुन दिली

सरकार स्थापन झाल्यानंतर ही योजना सुरु राहिल का? असा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. महायुतीच्या नेत्यांनी या योजना सुरु राहतील असं वारंवार सांगितलं आहे. महायुतीने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून महिन्याला 1500 ऐवजी 2100 रुपये जमा करण्याच आश्वासन दिलं आहे. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीला त्याच आश्वासनाची आठवण करुन दिली.

काय मागणी केली?

“देवेंद्रजी म्हणाले की, लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून 2100 रुपये देणार आहोत. नवीन वर्ष सुरु होतय. डिसेंबर किंवा जानेवारी, डिसेंबर महिना सुरु झालाय, पण शक्य असेल, तर डिसेंबरपासूनच किंवा 1 जानेवारी 2025 पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात महिना 2100 रुपये जमा करा. आम्ही तर म्हणतो 3 हजार रुपये द्या, कारण आम्ही सत्तेवर आलो असतो, तर महिना 3 हजार रुपये देणार होतो” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.
शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक अन् नाराजांसाठी एकनाथ शिंदेंचा तोडगा
शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक अन् नाराजांसाठी एकनाथ शिंदेंचा तोडगा.