मुख्यमंत्रीपासून मंत्रीपदाच्या फॉर्म्युल्यापर्यंत उद्या दिल्लीत मोठा निर्णय होणार; एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर सस्पेंस मोडला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत गेल्या ४ दिवसांपासून चर्चा होत होती, शिवसेना मुख्यमंत्रीपदाबाबत ठाम असल्याचं बोललं जात होतं. पण एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

मुख्यमंत्रीपासून मंत्रीपदाच्या फॉर्म्युल्यापर्यंत उद्या दिल्लीत मोठा निर्णय होणार; एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी माहिती
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 4:45 PM

Eknath Shinde on CM post : राज्यात महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा सस्पेंस तयार झाला होता. त्यावर आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सस्पेंस संपवला आहे. शिंदे म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल. महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे. महायुतीला मजबुतीने उभी करायची आहे. उद्या आमची बैठक आहे. तिन्ही पक्षाची दिल्लीत बैठक होईल. अमित शाह यांच्यासोबत तिथे चर्चा होईल. त्यात इतर निर्णय होईल. असं शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘काल मोदी आणि शाह यांच्याशी फोनवर बोललो. सरकार बनवण्यात आमचा कोणताही अडथळा नाही. तुम्ही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. आजही मी सांगितलं की वरिष्ठ निर्णय घेतील तो मान्य राहील. उद्या बैठकीत चर्चा होईल महायुतीच्या सरकारबाबत चर्चा होईल.’

आम्ही महायुतीचे लोकं आहोत. त्यांनी अडीच वर्ष मला पाठिंबा दिला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होत आहे. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य. आमचं पूर्ण समर्थन त्यांच्या उमेदवाराला असेल असं ही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

‘सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांचं होतं. ते मोदी आणि शाह यांनी पूर्ण केलं. ते माझ्या पाठी पहाडासारखे उभे राहिले. मी अडीच वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. दिवस रात्र काम केलं. कॉमन मॅनचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं. लाडका भाऊ ही माझी ओळख झाली. ही ओळख सर्वात मोठी आहे.’ असं ही एकनाथ शिंदे म्हणाले.

‘दोन चार दिवसांपासून आम्ही नाराज असल्याची चर्चा आहे. पण आम्ही नाराज होणारे नाही. आम्ही घरात बसणारे नाही. आम्ही एकत्रपणे काम करू. आम्हाला मोठा विजय मिळाला आहे. आता महायुतीचं सरकार भक्कमपणे काम करणार आहे.’ असं शिंदे म्हणाले.

सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.