कोल्हापूरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळासाठी निधी उपलब्ध; प्रस्ताव सादर करण्याचे धनंजय मुंडेचे प्रशासनाला निर्देश
कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण आणि इतर कामांसाठी शासनाकडे निधी उपलब्ध आहे. ही विकासकामे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेंतर्गत करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील समाधीस्थळाच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध आहे. याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समाधीस्थळाचे नूतनीकरण आणि इतर कामांसाठी निधी मिळणेबाबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीला कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, कोल्हापूर महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Funds available for Chhatrapati Shahu Maharaj’s memorial- Dhananjay Munde)
मुंडे म्हणाले, कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण आणि इतर कामांसाठी शासनाकडे निधी उपलब्ध आहे. ही विकासकामे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेंतर्गत करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. हे समाधीस्थळ लवकरात लवकर होणे गरजेचे असून तसा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ पाठवावा, असे निर्देश श्री.मुंडे यांनी प्रशासनाला दिले.
8 कोटी 28 लाखांचा निधी मंजूर करण्यात येणार
‘सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून रु. 8 कोटी 28 लाखांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे. कोल्हापूरकरांचे शक्तिस्थळ असलेल्या राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या समाधीस्थळासाठी तात्काळ आर्थिक मदत केल्याबद्दल दोन्ही मंत्री महोदयांचे मनापासून आभार. याबाबतचा प्रस्ताव आजच कोल्हापूर समाज कल्याण विभागाकडून शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार बांधण्यात आलेल्या या समाधीस्थळाचे गेल्या वर्षी मा. शरद पवार साहेब यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे’, असं ट्वीट कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दुपारी केलं आहे.
सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून रु. 8 कोटी 28 लाखांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे. pic.twitter.com/QGGzpc8dXG
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) August 5, 2021
तृतीयपंथीयांची नोंदणी तातडीने सुरू करण्याचे निर्देश
राज्यातील तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणासाठी महामंडळ स्थापन केले आहे. महामंडळाच्या माध्यमातून योजना राबविण्यासाठी तृतीयपंथीयांची आकडेवारी शासनाकडे उपलब्ध व्हावी यासाठी या घटकांनी पुढे येऊन नोंदणी करावी. ही नोंदणी प्रक्रिया तृतीयपंथीयांच्या नोंदणीकृत संस्थांच्या मार्फत विभागीय स्तरावरून तातडीने सुरू करावी अशी सूचना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. तसेच ही प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी समाजकल्याण आयुक्त आणि संघटनांना दिल्या.
इतर बातम्या :
राज्यातील तृतीयपंथीयांची नोंदणी तातडीने सुरू करा, धनंजय मुंडे यांचे निर्देश
नायगाव पोलीस वसाहतीतील पोलीस कुटुंबीयांना नोटीसा; फडणवीस म्हणतात, निर्णयाला स्थगिती द्या
Funds available for Chhatrapati Shahu Maharaj’s memorial- Dhananjay Munde