नक्षलविरोधी मोठी कारवाई केलेल्या गडचिरोली पोलिसांचा सन्मान, पालकमंत्री एकनाथ शिंदेंची बक्षिसाची घोषणा
गडचिरोली पोलिस विभागाला जिल्हा नियोजन मधील निधीतून 51 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा आज करण्यात आली. पोलिसांचे मनोबल वाढावे व त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून या निधीचा निश्चितच त्यांना फायदा होईल, असं शिंदे यावेळी म्हणाले.
गडचिरोली : 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या गडचिरोली पोलिसांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नगरविकास मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबत घोषणा केलीय. गडचिरोली पोलिस विभागाला जिल्हा नियोजन मधील निधीतून 51 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा आज करण्यात आली. पोलिसांचे मनोबल वाढावे व त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून या निधीचा निश्चितच त्यांना फायदा होईल, असं शिंदे यावेळी म्हणाले. (Gadchiroli Police Department gets Rs 51 lakh from District Planning Fund)
शनिवारी गडचिरोली- छत्तीसगडच्या सीमेवर धानोरा तालुक्यात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत सी-60 जवानांकडून 26 नक्षलवादी मारले गेले. याबाबत त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे शिंदे यांनी सी-60 जवानांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी सी-60 जवानां सह इतर सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेही अभिनंदन केले. पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी ज्या अडचणी असतील त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी चर्चा करुन सोडवल्या जातील. या कारवाईमुळे नक्षल चळवळीला जबरदस्त हादरा बसलेला आहे. तसेच या कारवाईमुळे देशभरात जे नक्षली संघटना आहेत, त्यांनाही जबर हादरा बसल्याचं शिंदे यावेळी म्हणाले.
‘पोलिसांच्या मागण्या जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार’
नक्षलविरोधी कामगिरी बजावणाऱ्या शहिदांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहणार आहे. त्यांच्या मागण्यांची शासन दखल घेणार असल्याची ग्वाही पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी आपल्या संबोधनादरम्यान दिली. यावेळी पोलिसांकडून असलेल्या त्यांच्या मागण्या मी सोबत घेऊन जात आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या काळात जलद गतीने त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
नक्षलग्रस्त राज्यांमधील नक्षलींना मोठा धडा
नुकत्याच झालेल्या नक्षली चकमकीत 26 नक्षलवादी मारले गेले. यावेळी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला अत्याधुनिक शस्त्र पुरवठा मी पाहिला. या कारवाईमुळे महाराष्ट्रासह इतर नक्षलग्रस्त राज्यांमधील नक्षलींनी धडा शिकवण्यात आपल्या राज्याला यश आल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी शिंदे यांनी उपस्थित पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधिक्षक गडचिरोली अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक केले व अभिनंदनही केले.
इतर बातम्या :
फुकट्यांकडून 100 कोटींची वसुली! रेल्वेचा मोठा महसुली तोटा वाचला
आनंदराव अडसूळांचा तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, अडचणी वाढणार?
Gadchiroli Police Department gets Rs 51 lakh from District Planning Fund