कोकणवासीयांना गणराया पावले, 278 स्पेशल रेल्वेनंतर महामंडळाकडून 4300 बसेस, एसटीत सवलतीचा प्रवास

Ganpati Train and bus Konkan: गतवर्षी 3500 बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये 800 बसेसची वाढ करण्यात आली आहे. गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण असल्याने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

कोकणवासीयांना गणराया पावले, 278 स्पेशल रेल्वेनंतर महामंडळाकडून 4300 बसेस, एसटीत सवलतीचा प्रवास
st bus
Follow us
| Updated on: Aug 01, 2024 | 9:19 AM

मुंबईतील हजारो चाकरमाने गणपतीसाठी कोकणात गावी जात असतात. त्यामुळे त्या काळात बसेस आणि रेल्वेचे आरक्षण मिळणेही अवघड असते. अनेकांना खासगी गाड्यांचा वापर करावा लागतो. त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. यंदा 7 सप्टेंबर 2024 रोजी श्री गणरायाचे आगमन होत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी गावी जाण्याचे वेध चाकरमान्यांना लागले आहे. त्यांच्यासाठी रेल्वेने 278 स्पेशल रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. एसटी महामंडळाने 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4300 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटीत मिळणार सवलती

मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने तयारी केली आहे. यंदा 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4300 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. 2 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

मागील वर्षी 3500 बसेस

गतवर्षी 3500 बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये 800 बसेसची वाढ करण्यात आली आहे. गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण असल्याने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. किंबहुना, गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे 4300 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील.

हे सुद्धा वाचा

रेल्वेने आणखी 20 फेऱ्या वाढवल्या

मध्य आणि पश्चिम रेल्वे 1 ते 19 सप्टेंबर दरम्यान 259 विशेष रेल्वे सोडणार होते. परंतु प्रवाशांची मागणी पाहिल्यावर आणखी 20 रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईवरुन कोकणात जाण्यासाठी 278 रेल्वे असणार आहे.

गणोशोत्सवासाठी या 20 विशेष रेल्वे

  • 01031/2 लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी-लोकमान्य टिळक टर्मिनस (8 फेऱ्या)
  • 01445/6 पुणे-रत्नागिरी-पुणे (2 फेऱ्या)
  • 01441/2 पनवेल-रत्नागिरी-पनवेल (2 फेऱ्या)
  • 01447/8 पुणे-रत्नागिरी-पुणे ( 4 फेऱ्या)
  • 01443/4 रेल्वे 4 फेऱ्या सोडणार आहेत.

हे ही वाचा…

कोकणातील चाकरमान्यांना गणपती बाप्पा पावला, विशेष रेल्वेच्या 278 फेऱ्या

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.