नवी मुंबई : भाजपचे आमदार आमदार गणेश नाईक (bjp mla ganesh naik) हे अटकेपासून वाचण्यासाठी धावाधाव करतायेत. गणेश नाईकांवर (ganesh naik) बलात्काराचा आरोप आहे. गणेश नाईकांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. अटक करण्यापूर्वी नोटीस बजावण्यात यावी, यासाठी हा अर्ज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात (Court) दाखल करण्यात आला आहे. गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे ते अटकेपासून वाचण्यासाठी धावाधाव करता आहेत. गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान यांनी गंभीर आरोप केलेत. माझ्या न्याय हक्कासाठी मी लढाई लढत आहे. गेली 27 वर्षे मी गणेश नाईक यांच्या संपर्कात आणि संबंधात होते. एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून गणेश नाईक यांच्याविरोधात सीबीडी बेलापूर आणि नेरुळमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तक्रारीनंतरही नाईक यांच्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याने येथील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. त्यामुळेच काल महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी काल वाशी पोलीस आयुक्तालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.
गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान यांनी गंभीर आरोप केलेत. माझ्या न्याय हक्कासाठी मी लढाई लढत आहे. गेली 27 वर्षे मी गणेश नाईक यांच्या संपर्कात आणि संबंधात होते. गणेश नाईक हे मला नुसते आश्वासन द्यायचे. आमच्या संबंधातून मला एक मुलगाही आहे. नाईकांनी मला आश्वासन दिलं होतं की, मुलगा पाच वर्षाचा झाल्यानंतर मी वडील म्हणून त्याला नाव देईन. परंतू त्यांनी तसं काहीच केलं नाही. नाईकांनी आम्हाला कोणतंच आर्थिक पाठबळ दिलं नाही. नाईक यांच्यासोबत मी पूर्वी संबंधात होते. त्या संबंधातून मुला झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर अनेकवेळा जबरदस्तीही केली. माझं लैंगिक शोषण झालं, असा आरोप दीपा चौहान यांनी केलाय. तसंच नाईक आणि त्यांच्या परिवारानं मला अनेकवेळा अपमानास्पद वागणूक दिली. अनेकवेळा त्यांच्या मुलाकडून मला धमक्याही देण्यात आल्या. एकदा माझा मुलगा त्यांच्या बालाजी टॉवर या राहत्या घरी गेल्यावर त्याला हाकलून देण्यात आलं. त्यानंतर मी स्वत: मुलाला घेऊन गेल्यानंतर आम्हाला हाकलून देत, अपमानास्पद वागणूक देण्यात आली. माझा शारीरिक आणि मानसिक छळ नाईक यांनी केलाय. आता त्यांच्याविरोधात अनेक संघटना, पक्ष पुढे येत आहेत. त्यांच्या अटकेची मागणी होतेय. पण मला त्याबाबत काही बोलायचं नाही. मला न्याय आणि माझा हक्क मिळाला पाहिजे. मी वकिलामार्फत माझी लढाई लढत आहे, अशी माहितीही चौहान यांनी दिलीय.
एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून गणेश नाईक यांच्याविरोधात सीबीडी बेलापूर आणि नेरुळमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तक्रारीनंतरही नाईक यांच्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याने येथील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. त्यामुळेच काल महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी काल वाशी पोलीस आयुक्तालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी महिलांनी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत आपला संतापही व्यक्त केला. एक दो एक दो गणेश नाईक को फेक दो, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, अटक करा, अटक करा, गणेश नाईकांना अटक करा आणि गणेश नाईकांची दादागिरी नही चलेगी, नही चलेगी अशा घोषणाही या महिला आंदोलकांनी दिल्या.
इतर बातम्या
PS5 च्या विक्रीला लवकरच होणार सुरुवात, जाणून घ्या खरेदीवरील स्पेशल ऑफर