अकोल्यात फसवणूक करणारी टोळी गजाआड, सुंदर मुली दाखवून लग्न लावायचं अन्…
या टोळीने अनेकांना लाखोंचा गंडा घातला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे असा काही प्रकार तुमच्यासोबतही घडत असेल तर सावधान राहा आणि वेळीच पोलिसांना याची माहिती द्या असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
अकोला : युवकांना सुंदर मुली दाखवून त्या मोबदल्यात लाखोंची रक्कम उकळून फसवणूक करणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील पांघरी नवघरे इथल्या म्होरक्यासह पाच जणांची टोळी डाबकी रोड पोलिसांनी गजाआड केली आहे. या टोळीने अनेकांना लाखोंचा गंडा घातला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे असा काही प्रकार तुमच्यासोबतही घडत असेल तर सावधान राहा आणि वेळीच पोलिसांना याची माहिती द्या असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. (Gang arrested for cheating in fake marriage in Akola)
मिळालेल्या माहितीनुसार, सुदाम तुळशीराम करवते ऊर्फ योगेश मूळ नाव गुलाब नारायण ठाकरे हा या टोळीचा म्होरक्या असून त्याचे साथीदार शंकर बाळू सोळंके रा . सातमैल (वाशिम रोड अकोला), संतोष ऊर्फ गोंडू सीताराम गुडधे (राहणार आगीखेड ता . पातूर), हरसिंग ओंकार सोळंके (रा .चांदुर ता . अकोला) या तीन जणांसह एक महिला जळगाव खान्देश इथल्या तर दुसरी अकोला इथली असून या पाच आरोपींना डाबकी रोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील करमूड या गावातील रहिवासी अतुल ज्ञानेश्वर सोनवने पाटील आणि नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी इथला रहिवासी 28 वर्षीय राहुल विजय पाटील यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
ही कारवाई ठाणेदार विजय नाफडे, मनोज भारंबे, श्रीधर सरोदे, दिनेश पवार, नरेंद्र जाधव, विरेंद्र खेरडे, पंकज सुर्यवंशी, सुनील काळे, ख्वाजा शेख, ओम बैनवाड, अंजू भटकर, हर्षा बाटे यांच्याकडून करण्यात आली आहे. (Gang arrested for cheating in fake marriage in Akola)
संबंधित बातम्या –
सरकारने एल्गार परिषदेला अचानक परवानगी का दिली; ब्राह्मण महासंघाचा सवाल
नंदुरबारमध्ये मजुरांच्या वाहनाला भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, 5 महिलांचा समावेश
उद्धव ठाकरे हा दानशूर व्यक्ती, तुमच्यासारखा भिकारी नाही; अब्दुल सत्तारांचा भाजपवर घणाघात
(Gang arrested for cheating in fake marriage in Akola)