उस्मानाबाद हारदलं! शेजारी राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीला बळजबरी घरातून उचलून सामूहिक बलात्कार
उस्मानाबेदत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे (Gang rape on minor girl in Osmanabad)
उस्मानाबाद : महिला सक्षमीकरणावर नेहमी चर्चा केली जाते. अनेक संस्था-संघटनांडून महिलांच्या सक्षमीकरण आणि सुरक्षेसाठी वेगवगळे उपक्रम राबविले जातात. मात्र, तरीदेखील महिला अत्याचाराच्या घटना सर्रासपणे घडताना दिसतात. उस्मानाबादेत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा हादरला आहे (Gang rape on minor girl in Osmanabad).
पीडित अल्पवयीन ही नराधम राहत असलेल्या घराच्या शेजारी वास्तव्यास होती. नराधम जबरदस्ती तिच्या घरात शिरले. ते मुलीला बळजबरी घरातून उचलून घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. या संतापजनक घटनेनंतर संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत आणि कलम 363, 376 अंतगर्त गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना याप्रकरणातील तीन आरोपींपैकी दोन आरोपींना पकडण्यात यश आलं आहे. तर आणखी एका आरोपीचा शोध सुरु आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक जगदीश राऊत हे तपास करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिप्परसे यांनी ही माहिती दिली (Gang rape on minor girl in Osmanabad).
संबंधित बातमी : उस्मानाबादेत 11 वर्षीय बालिकेवर गँगरेप, चौघा अल्पवयीन तरुणांवर गुन्हा