गणेशोत्सवासाठी कोकणात जायचं? ट्रेनचं बुकींग फुल्ल झालेत? ‘या’ तारखेपासून करता येणार एसटीचे बुकींग

आपल्या लाडक्या गणपती बाप्पााच्या आगमनाला फक्त दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जायचं? ट्रेनचं बुकींग फुल्ल झालेत? 'या' तारखेपासून करता येणार एसटीचे बुकींग
गणेशोत्सवसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 9:06 AM

Ganpati Festival 2024 : गणेशोत्सव आणि कोकण हे एक अनोखं समीकरण आहे. कोकणात गणेशोत्सवाचा एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो. कोकणात गणेशोत्सव आणि शिमगा या दोन सणांना विशेष महत्त्व दिले जाते. गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या फार मोठी असते. याच पार्श्वभूमीवर राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण लवकरच सुरु केले जाणार आहे. तसेच गणेशोत्सव काळात जादा एसटी फेऱ्याही चालवण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते. आपल्या लाडक्या गणपती बाप्पााच्या आगमनाला फक्त दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने नियमित आणि विशेष गाड्यांच्या आरक्षणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने गाड्यांचे आरक्षण गुरुवारी 4 जुलैपासून सुरु होणार आहे. यात चाकरमान्यांना ग्रुपपासून ते वैयक्तिक आरक्षणही करता येणार आहे. विशेष म्हणजे कोकणात जाण्यासह परतीचे आरक्षणही गुरुवारपासूनच सुरु होणार आहे.

सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

कोकणासह राज्यातील सर्व विभागांमध्ये गणेशोत्सव काळासाठी नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण गुरुवारपासून खुले होणार आहे. सध्या धावणाऱ्या नियमित गाड्या वेळापत्रकाप्रमाणे सुटतील. त्यासोबतच मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल आणि कुर्ला नेहरूनगर या ठिकाणाहून २ आणि ३ सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. तर कणकवली, राजापूर, विजयदुर्ग, दापोली, भालावली, देवगडदरम्यान जादा एसटी फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यासोबतच गणेशोत्सवासाठी जादा गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अॅप किंवा वेबसाईटवरुनही करता येईल बुकींग

कोकणातील अनेक चाकरमानी हे गावी जाण्यासाठी गणेशोत्सवासाठी वाड्या-वाड्यांचे एकत्रित आरक्षण करतात. त्याच पार्श्वभूमीवर आता प्रवाशांना वैयक्तिक आरक्षणासह समूह आरक्षणही एकाच दिवशी करता येणार आहे. महामंडळाच्या आरक्षण केंद्रासह मोबाईल अॅप आणि महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवाशांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

दरम्यान गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी गाड्यांचे आरक्षण 60 दिवसआधी खुले करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यापूर्वी 30 दिवस आधी गाड्यांचे आरक्षण करण्याची मुभा होती. तर रेल् वेगाड्यांचे आरक्षण 120 दिवस आधी सुरु होते. मात्र या काळात गाड्यांना होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रवाशांनी आरक्षण करूनच सुखरूप प्रवास करावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

Non Stop LIVE Update
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.
वर्ल्डकप जिंकल्यानं या खेळाडूना सरकारकडून बक्कळ पैसा, इतके कोटी देणार
वर्ल्डकप जिंकल्यानं या खेळाडूना सरकारकडून बक्कळ पैसा, इतके कोटी देणार.
लाडकी बहीणच्या फॉर्मवरच्या फोटोंवरून राजकारण, कोणत्या नेत्यांचे चेहरे?
लाडकी बहीणच्या फॉर्मवरच्या फोटोंवरून राजकारण, कोणत्या नेत्यांचे चेहरे?.
विधानपरिषदेत कोणाचा गेम? नार्वेकरांमुळे कुणाची विकेट? दरेकरांनी म्हटलं
विधानपरिषदेत कोणाचा गेम? नार्वेकरांमुळे कुणाची विकेट? दरेकरांनी म्हटलं.
लाडकी बहीणचा लाभ फक्त 3 महिनेच मिळणार? कुणाचा सरकारच्या दाव्यावर सवाल?
लाडकी बहीणचा लाभ फक्त 3 महिनेच मिळणार? कुणाचा सरकारच्या दाव्यावर सवाल?.
वर्ल्डकप घेवून टीम इंडियाची ग्रॅण्ड एन्ट्री अन्...जे पाहायला मिळालं ते
वर्ल्डकप घेवून टीम इंडियाची ग्रॅण्ड एन्ट्री अन्...जे पाहायला मिळालं ते.
वेलकम 'चॅम्पियन्स'... टीम इंडियाचं मुंबई विमानतळावर दणक्यात आगमन
वेलकम 'चॅम्पियन्स'... टीम इंडियाचं मुंबई विमानतळावर दणक्यात आगमन.
VIDEO : गर्दी नव्हे तर क्रिकेटचे दर्दी, मुंबईत क्रिकेटप्रेमींचा जनसागर
VIDEO : गर्दी नव्हे तर क्रिकेटचे दर्दी, मुंबईत क्रिकेटप्रेमींचा जनसागर.
मुंबईचा राजा रोहित शर्मा...मरीनसह वानखेडेवर एकच घोषणा, बघा व्हीडिओ
मुंबईचा राजा रोहित शर्मा...मरीनसह वानखेडेवर एकच घोषणा, बघा व्हीडिओ.