गणेश विसर्जनसाठी गेलेल्या भक्तांवर काळाचा घाला, अमरावती, नगर, नाशिकमध्ये बुडून मृत्यू

ganesh visarjan: नाशिक जिल्ह्यात दोघांचा  बुडून मृत्यू झाला आहे. अहमदनगरही जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. गणपती विसर्जनासाठी गेलेले तीन तरुण गणेश भक्त नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडली.

गणेश विसर्जनसाठी गेलेल्या भक्तांवर काळाचा घाला, अमरावती, नगर, नाशिकमध्ये बुडून मृत्यू
ganesh visarjan (file Photo)
Follow us
| Updated on: Sep 18, 2024 | 10:21 AM

राज्यात सर्वत्र मंगळवारी गणेश विसर्जन झाले. पुणे आणि मुंबईत अजूनही विसर्जन मिरवणूक सुरु आहे. राज्यात ठिकठिकाणी विसर्जनसाठी गेलेल्या गणेश भक्तांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यात दोघांचा  बुडून मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. गणपती विसर्जनासाठी गेलेले तीन तरुण गणेश भक्त नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडली.

अमरावतीमध्ये तिघांचा मृत्यू

गणपती विसर्जना दरम्यान अमरावती जिल्ह्यातील तीन तरुण गणेशभक्तावर काळाने घाला घातला. अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील पूर्णा नदीत अचलपूर तालुक्यातील 2 युवक तर दर्यापूर तालुक्यातील 1 युवक वाहून गेल्याची घटना घडली आहे. नदीत वाहून गेलेल्या गणेश भक्तांचा सध्या शोध सुरू आहे. मयूर गजानन ठाकरे (वय २८), अमोल विनायक ठाकरे (वय ४०, राहणार ईसापुर) आणि दारापूर येथील राजेश पवार असे वाहून गेलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

नाशिकमध्ये दोन भावी अभियंत्यांचा मृत्यू

नाशिकमध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन युवकांचा वालदेवी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील ही घटना घडली. ओंकार गाडे आणि स्वयंम मोरे अशी दोघा मृत युवकांची नावे आहेत. हे दोघे जण संध्याकाळी मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेले असता नदीपात्रातील एका खड्ड्यात पडले. मात्र त्यांच्यापर्यंत मदत पोहचेपर्यंत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. एका तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. ओंकार शहरातील केटीएचएम महाविद्यालय तर स्वयंम अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता.

हे सुद्धा वाचा

अहमदनगरमध्ये दोघांचा मृत्यू

गणपती विसर्जना दरम्यान दोन युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यामध्ये घडली. मंगळवारी सायंकाळी विळद गावातील साकळाई तलाव येथे ही घटना घडली. घरगुती गणपती विसर्जन करत असताना पाय घसरून तलावात पडल्याने बुडून मृत्यू झाला. अजिंक्य नवले (वय16) आणि केतन शिंदे (वय18) असे मयत युवकांची नावे आहेत.

विरारमध्ये एकाचा मृत्यू

विरारमध्ये गणपती विसर्जन करताना गणेश भक्ताचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमित सतीश मोहिते ( वय 24) असे मृत्यू झालेल्या गणेश भक्ताचे नाव आहे. तो विरार पूर्व फुलपाडा परिसरातील राहणारा होता. बुधवारी पहाटे साडेतीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे. गणपती विसर्जन करताना पाण्यात तरुणाला फिट येऊन तो पाण्यात बुडाला.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.