गौतमीचा ठेका, सत्तार म्हणाले, हुल्लडबाजांना ठोका, व्यासपीठावरुन शिवराळ भाषेत

gautami patil | नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला आहे. छत्रपती संभाजीनगरात राज्याचे अल्पसंख्यांक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अब्दुल सत्तार यांनी अगदी शिवराळ भाषा वापरली. पोलिसांना मारण्याचे आदेश दिले.

गौतमीचा ठेका, सत्तार म्हणाले, हुल्लडबाजांना ठोका, व्यासपीठावरुन शिवराळ भाषेत
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 12:20 PM

संभाजीनगर, दि. 4 जानेवारी 2024 | नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरात प्रचंड गोंधळ झाला. राज्याचे अल्पसंख्यांक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसनिमित्त गौतमी पाटील हिचा नृत्याच्या कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी हजारोंचा जमाव जमवला. त्यावेळी काही युवकांनी गोंधळ सुरु केला. त्यानंतर अब्दुल सत्तार प्रचंड नाराज झाले. त्यांचा बोलताना तोल सुटला. त्यांनी शिवराळ भाषा वापरणे सुरु केले. गौतमीचा ठेका पाहण्यासाठी आलेले कार्यकर्त्यांना ठोका असे आदेश त्यांनी व्यासपीठावरुन बोलताना दिले.

काय घडला प्रकार

राज्याचे अल्पसंख्यांक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात तुफान राडा झाला आहे. यावेळी अब्दुल सत्तार चांगलेच संतापले. त्यांनी व्यासपीठावर जाऊन माईकचा ताबा घेतला. त्यानंतर त्यांना गोंधळ करणाऱ्यांना मारण्याचे आदेश पोलिसांना दिले. यावेळी त्यांनी शिवराळ भाषेचाही वापर केला. ते म्हणाले, हे पोलीस वाले त्या लोकांवर लाठीमार करा. त्यांना इतका मारे की XX तुटून जाईल. त्यांना हाणा, हे खाली बैस…XX तुझ्या बापाने कधी पाहिला कार्यक्रम…असे ते म्हणत होते.

अब्दुल सत्तार आणि वाद

अब्दुल सत्तार आणि वाद हे एक समीकरणच झाले आहे. त्यांच्या मुलीच्या टीईटी परीक्षेवरुन वाद झाला होता. दसरा मेळाव्याला मतदारांना मुंबई वारी करायला लावल्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यांची जीभ यापूर्वी अनेक वेळा घसरली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या समर्थकांनी सिल्लोडमध्ये सामजिक कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. असंसदीय भाषेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. भाजप नेते हरिभाऊ बागडे यांच्याबद्दल त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या सर्व प्रकरणामुळे ते नेहमी चर्चेत राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिली होती.

बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांच्यासोबतचे प्रकरण राज्यभर गाजले होते. शर्मा यांनी मी चहा पीत नाही, असे म्हटले होते. त्यावेळी त्यांनी तर दारू पिता का ? असा प्रश्न विचारला होता. तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.