संभाजीनगर, दि. 4 जानेवारी 2024 | नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात काही ना काहीतरी गोंधळ होत असतो. गौतमी पाटील हिचा कार्यक्रमासाठी हजारो लोक एकत्र येतात. या लोकांना सांभाळताना पोलिसांची चांगलीच कसरत होते. त्यातच मंत्र्याचा वाढदिवस आणि गौतमी पाटील हे समीकरण छत्रपती संभाजीनगरात जुळून आले. या कार्यक्रमात काही युवकांनी प्रचंड हुल्लडबाजी केली. पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. राज्याचे अल्पसंख्यांक व पणन मंत्री अब्दुल सत्तार हे कार्यकर्त्यांवर नाराज झाले. ते कार्यकर्त्यांना खाली बसा, खाली बसा असे वारंवार आवाहन केले. त्यानंतर गोंधळ सुरु राहिल्यानंतर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
राज्याचे अल्पसंख्यांक व पणन मंत्री अब्दुल सत्तार याच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तुफान राडा झाला. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मात्र तरीही प्रेक्षकांनी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात प्रचंड राडा केला. यावेळी अब्दुल सत्तार सुद्धा संतापले. त्यांनी वारंवार खाली बसण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात काही गद्दार लोक आले आहे. त्यांना पोलीस सरळ करतील आणि कार्यक्रम सुरु होईल, असे सत्तार व्हिडिओत बोलताना दिसत आहे. जोपर्यंत तुम्ही खाली बसणार नाही, तोपर्यंत कार्यक्रम सुरु होणार नाही, असे ते बोलत आहे. परंतु त्यानंतर गोंधळ सुरु होता. यामुळे पोलिसांनी गोंधळ करणाऱ्यांवर सौम्य लाठीमार केला.
गौतमी पाटील हिने तिच्या आदाकारीने तरुणाईवर मोहिनी घातली आहे. यामुळे तिचा कार्यक्रमासाठी परिसतील तरुणाई मोठ्या संख्येने येत असते. यापूर्वी रिलस्टार म्हणून प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात अनेक वेळा गोंधळ झाला आहे. प्रचंड गर्दीमुळे आणि अती उत्साही युवकांच्या हुल्लडबाजीमुळे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात वाद होतो. कधी तिने केलेल्या डन्सवरुन वाद निर्माण झाले आहे. मध्यंतरी तिच्या चेंजिंग रुममध्ये चोरुन चित्रीकरण झाले होते.