मला तर फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेसे वाटतात; गिरीश बापटांचा चिमटा

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी तेही मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहत असल्याचं म्हटलं आहे. त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. (girish bapat comment on Jayant Patil desire of becoming chief minister)

मला तर फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेसे वाटतात; गिरीश बापटांचा चिमटा
girish bapat
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 4:05 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी तेही मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहत असल्याचं म्हटलं आहे. त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला तर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, असा चिमटा गिरीश बापट यांनी काढला आहे. (girish bapat comment on Jayant Patil desire of becoming chief minister)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बापट आले होते. त्यावेळी त्यांनी हा चिमटा काढला. जयंत पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, हे मी तुमच्या माध्यमातूनच ऐकत आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत जयंतराव आणि मुख्यमंत्र्यांनीच ठरवायचे आहे, असा चिमटा काढतानाच मला तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतंय, असं बापट म्हणाले.

दर 2-3 महिन्यांनी बैठक व्हावी

केंद्र आणि राज्याचे काही कॉमन प्रश्न आहेत. त्यावर राज्य आणि केंद्र सरकारकडून काही निर्णय घेता येईल, याबाबत चर्चा झाली. रेल्वे सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. केंद्राने राज्याला अधिकाधिक निधी देण्याबाबतही चर्चा झाली. राज्यातील अपूर्ण प्रकल्पांचा आढावाही यावेळी घेण्यात आला. राज्यातील रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यावरही चर्चा करण्यात आल्याचं बापट म्हणाले. बैठक चांगली झाली. दर 2 ते 3 महिन्यांनी अशी बैठक घेतली तर प्रश्न सोडवणं सोपं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

सीमाप्रश्नी पंतप्रधानांना भेटणार?

आजच्या बैठकीत सीमा प्रश्नावरही चर्चा झाली. सीमाप्रश्नी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. सीमा प्रश्नी सर्व खासदारांनी पंतप्रधानांना भेटण्याचा बैठकीतील सूर होता. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नी सर्व खासदारांनी साथ द्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचं बापट यांनी सांगितलं. केंद्राकडून जीएसटीपोटी 25 हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. राज्याला जीएसटीचा हा परतावा मिळावा, याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचंही ते म्हणाले. (girish bapat comment on Jayant Patil desire of becoming chief minister)

संबंधित बातम्या:

अटक टाळण्यासाठी एकनाथ खडसेंचा आटापिटा, मात्र दिलासा देण्यास ED चा विरोध

मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न जयंत पाटलांचं, भाजपचा टोला रोहित पवारांना

“…तर जयंतरावांना ईश्वराला शंभर वर्षांपेक्षा अधिक आयुष्य मागावं लागेल”

(girish bapat comment on Jayant Patil desire of becoming chief minister)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.