“महाविकास आघाडीच्या अर्ध्या मंत्र्यांना वाटतं मराठा आरक्षण देऊ नये”

राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना मराठा आरक्षण देऊ नये असं वाटतं, अशी टीका माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर केली.

महाविकास आघाडीच्या अर्ध्या मंत्र्यांना वाटतं मराठा आरक्षण देऊ नये
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 11:37 PM

जळगाव : राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना मराठा आरक्षण देऊ नये असं वाटतं, अशी टीका माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)  यांनी राज्य सरकारवर केली. तसेच, मराठा आरक्षण हा केंद्राचा विषय नाही. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून मराठा आरक्षण दिलं, मराठा आरक्षणासाठी आम्ही केंद्र सरकारकडे जा म्हटलं नाही;  असा टोलाही त्यांनी राज्यसरकारला लगावला. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते. (Girish Mahajan criticizes Half ministers of Mahavikas Aghadi think that Maratha reservation should not be given)

“राज्यातील जवळपास 90 टक्के समाज हा उपेक्षित आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर आरक्षण मिळावे. कोर्टात तारीख आली तरी सरकार लक्ष ठेवत नाही.” असे ते म्हणाले. तसेच, हे सरकार दिल्लीलाही जात नाही आणि कमिटीही तयार करत नाही, असे म्हणत सरकार आरक्षणाविषयी गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. पुढे बोलताना ‘आजवर भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले. त्यामुळे तुम्ही भाजप सोडल्याने पक्षात अनागोंदी माजणार नाही’, असे म्हणत त्यांनी एकनाथ खडसे यांनाही लगावला.

दरम्यान, मराठा आरक्षणावरुन राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं जातं आहे. तर, मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही; असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलंच घेरल्याचं पाहायला मिळालं.

एकनाथ खडसेंवर निशाणा

आजवर भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले. त्यामुळे तुम्ही भाजप सोडल्याने पक्षात अनागोंदी माजणार नाही, असा टोला राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लगावला. आजही भाजपच्या ताब्यात राज्यातील 80 टक्के महापालिका आहेत. त्यामुळे आपण पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी कारभार सुरु झाला, असे नव्हे. मुळात भाजप मोठा पक्ष आहे. भाजपमधून अनेक मुख्यमंत्री गेले आणि आलेसुद्धा, पण त्याने फरक पडला नाही. त्यामुळे भविष्यातही भाजप पक्ष हा वाढतच जाईल, असा दावा गिरीश महाजन यांनी केला. (Girish Mahajan take a dig at Eknath Khadse)

संबंधित बातम्या :

ताकद दाखवण्यास सुरुवात, भाजपच्या बैठकीपेक्षा खडसेंच्या सत्काराला गर्दी

खडसेंच्या बालेकिल्ल्यातील भाजपच्या पक्षबांधणी बैठकीचा उडाला फज्जा; कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ

‘भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाने सुरुवात’

(Girish Mahajan criticizes Half ministers of Mahavikas Aghadi think that Maratha reservation should not be given)

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.