नाशिकमध्ये गोदावरीला दुसऱ्यांदा पूर; रामसेतू पुलाजवळ पाणी, नदीकाठची मंदिरे पाण्याखाली

नाशिकमध्ये (Nashik) गोदावरी (Godavari) नदीला यावर्षी बुधवारी (22 सप्टेंबर) दुसऱ्यांदा पूर (flood) आला आहे. रामसेतू पुलाजवळ पुराचे पाणी गेले असून, नदीकाठची सर्व मंदिरे पाण्याखाली बुडाली आहेत.

नाशिकमध्ये गोदावरीला दुसऱ्यांदा पूर; रामसेतू पुलाजवळ पाणी, नदीकाठची मंदिरे पाण्याखाली
नाशिकमध्ये गोदावरीला यावर्षी दुसऱ्यांदा पूर आला आहे.
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 3:51 PM

मनोज कुलकर्णी, नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) गोदावरी (Godavari) नदीला यावर्षी बुधवारी (22 सप्टेंबर) दुसऱ्यांदा पूर (flood) आला आहे. रामसेतू पुलाजवळ पुराचे पाणी गेले असून, नदीकाठची सर्व मंदिरे पाण्याखाली बुडाली आहेत. (Godavari floods for second time in Nashik; Water near Ramsetu bridge, riverside temples under water)

सध्या गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्प्याने वाढविण्यात येत आहे. आज बुधवारी (22 सप्टेंबर) दुपारी एक वाजता हा विसर्ग 6000 क्युसेक्स केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. दुपारी तीनपासून हा विसर्ग वाढवण्यात आला असून, तो 8 हजार क्युसेकपर्यंत नेण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीला वर्षातला दुसरा पूर आला आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचे पाणी गेले आहे. रामसेतू पुलाच्या जवळ पाणी पोहचले आहे. नदीकाठची सर्व मंदिरे पाण्याखाली बुडाली आहेत. नागरिकांनी नदीत पोहायला जावू नये, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत. नाशिककडे सुरुवातीला पाठ फिरवणाऱ्या पावसाने दुसऱ्या टप्प्यात जोरदार बॅटींग सुरू केली आहे. त्यामुळे नांदगाव, साकुरी या गावामध्ये दोनदा पूर आला आहे. यापूर्वी गोदावरीला एक पूर येऊन गेला आहे. सध्याही गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची हजेरी सुरू आहे.

धरणक्षेत्रात संततधार

नाशिकला पाणीपुरवठा करण्या गंगापूर धरण परिसरात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरण 99 टक्के भरले आहे. गोदावरी खोऱ्यातील गंगापूर धरण समूहात गंगापूर (मोठे), काश्यपी (मध्यम), गौतमी गौदावरी (मध्यम) आणि आळंदी (मध्यम) ही चार धरणे आहेत. यातील आळंदी धरण शंभर टक्के भरले आहे. गौतमी गौदावरीचा साठा 97 टक्क्यांवर, तर काश्यपीचा जलसाठा 87 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे यंदा नाशिककरांची पाणी चिंता मिटली आहे. दरम्यान, दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण तब्बल 98.70 टक्के भरले आहे. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला.

धरणांवर जमावबंदी

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणासह गंगापूर, दारणा, कश्यपी, मुकणे, भावली, वालदेवी, कडवा, गौतमी-गोदावरी, नांदूरमधमेश्वर, आळंदी, भोजापूर ही प्रमुख धरणे ही भरत आली आहेत. त्यामुळे धरण परिसरात 10 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या परिसरात पाचपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहेत. (Godavari floods for second time in Nashik; Water near Ramsetu bridge, riverside temples under water)

इतर बातम्याः

नाशिक-दिल्ली हवाहवाई; लवकरच सुरू होणार विमानसेवा!

कुबेराचं धन महाग…नाशिकमध्ये सोन्याला झळाळी!

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.