Gold Rate| सोन्याचे मायाजाल; जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील आजचे दर…
आपण सोने खरेदीच्या 36 महिन्यांअगोदर सोने विक्रीला काढले तर शॉर्ट टर्म कॅपिटल्स गेन टॅक्स लागतो आणि खरेदीच्या 36 महिन्यांनंतर सोने विक्री करताना लॉन्ग टर्म कॅपिटल्स गेन टॅक्स लागतो.
नाशिकः नाशिकमध्ये मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅम मागचे दर 48000 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46050 रुपये नोंदवले गेले. चांदीचे भाव किलोमागे 63500 रुपये राहिले, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. चालू आठवड्यात दोनशे ते चारशेच्या दरम्यान किरकोळ चढउतार होण्याची शक्यता आहे.
काय आहेत दर?
राज्यभरातही सोन्याच्या दरामध्ये तूर्तास मोठी चढ-उतार पाहायला मिळत नाही. मुंबईमध्ये मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 48490 रुपये नोंदवले गेले. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 48340 रुपये नोंदवले गेले. नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅम मागचे दर 48000 रुपये, 22 कॅरेट सोन्याचे दर 46050 रुपये, तर चांदीचे भाव किलोमागे 63500 रुपये नोंदवले गेले. औरंगाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 48570 रुपये पाहायला मिळाले. नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 48490 नोंदवले गेले. येणाऱ्या काळातही सोन्याच्या दरात मोठी चढ-उतार होण्याची शक्यता नाही.
सोन्यावरचा टॅक्स
आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदार सोने खरेदीला पसंती देतात. कोरोनाच्या काळात तर सोने खरेदी ही उत्तम गुंतवणूक मानली गेली. सोन्याच्या भावात नित्यनियमाने चढउतार झालेले पाहायला मिळतात. दरम्यान, सोन्यावर विविध टॅक्स लागत असतात. सोने खरेदी करताना आणि विक्री करताना देखील विविध स्वरुपाचे टॅक्स लागत असतात. जर आपण सोने खरेदीच्या 36 महिन्यांअगोदर सोने विक्रीला काढले तर शॉर्ट टर्म कॅपिटल्स गेन टॅक्स लागतो आणि खरेदीच्या 36 महिन्यांनंतर सोने विक्री करताना लॉन्ग टर्म कॅपिटल्स गेन टॅक्स लागतो.
नाशिकमध्ये मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅम मागचे दर 48000 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46050 रुपये नोंदवले गेले. चांदीचे भाव किलोमागे 63500 रुपये राहिले. येणाऱ्या काळातही हे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आत्ताच लगीन सराईची खरेदी करून ठेवावी. कारण नंतर सोन्याचे दर गगनाला भिडू शकतात. – गिरीश नवसे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन
24 कॅरेट सोने दर
– मुंबई – 48490 रुपये – पुणे – 48340 रुपये – नाशिक – 48000 रुपये – औरंगाबाद – 48570 रुपये – नागपूर – 48490 रुपये
इतर बातम्याः
नाशिक महापालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडी, भुजबळांचे संकेत, शिवसेना अन् काँग्रेस राजी होणार का?