Gondia : मृत्यू झालेल्या गाईचे केले विधीवत अंत्यसंस्कार, बळीराजासाठी हळवा क्षण
गेल्या 27 वर्षांपासून कुटुंबातील एक सदस्य असलेल्या गाईचे वृद्धापकाळाने तिचे निधन झालं. मात्र शिवणकर परिवाराने गायीचे विधीवत अंतसंस्कार करण्याचे ठरविले. गाईची अंत्ययात्रा काढून विधिवत गाईचे दफनविधी करण्यात आले.
गोंदिया : मानवाचा मृत्यू झाल्यावर अंतसंस्कार करतांना आपण नेहमीच पाहतो परंतु आपल्या घरातील पाडीव प्राण्याचा मृत्यू झाल्यास त्यांचे अंत्यसंस्कार करतांनाच्या घटना आपण क्वचितच पाहतो. अशीच एक हळवी घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. एका शतकऱ्याने मृत्यू पावलेल्या गाईला विधीवत अंत्यसंस्कार करत निरोप दिला आहे. गोंदियातील आमगावमधील ही घटना आहे.
गाईचे विधीवत अंत्यसंस्कार
भारत हा कृषी प्रधान देश आहे . आपल्या देशात अनेक पाळीव प्राणी शेतकरी पाळत असतात . त्यांची देवाणघेवाण ही होत असते. त्यात काही शेतकरी कुटुंब त्या पाळीव प्राणी यांना आपल्या कुटुंबाच्या सदस्यांप्रमाणे त्यांचे संगोपन करतात. असेच एक कुटुंब आमगाव शहरातील मनोहर शिवणकर यांचे आहे . यांनी आपल्या घरी एक लहानपना पासून पोटच्या मुलांच्या सारखे गायीचे चे संगोपन केले .गायीला आपण गौमाता सुद्धा मानतो . मनोहर शिवणकर त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक सुख आणि दुःख यांची ती साक्षीदार होती. गेल्या 27 वर्षांपासून कुटुंबातील एक सदस्य असलेल्या गाईचे वृद्धापकाळाने तिचे निधन झालं. मात्र शिवणकर परिवाराने गायीचे विधीवत अंतसंस्कार करण्याचे ठरविले. गाईची अंत्ययात्रा काढून विधिवत गाईचे दफनविधी करण्यात आले.
बळीराजासाठी हळवा क्षण
पोटच्या पोरासारख्या जपलेल्या जनावराचा मृत्यू हा, हा बळीराजासाठी अत्यंत हळवा क्षण असतो. शेतीला जोडधंदा म्हणून अनेकजण दुधाचा व्यवसाय करतात. त्यातून बळीराजाचा उदरनिर्वाह चालतो, बळीराजाची लेकरबाळं याचं गाईच्या दुधावर मोठी होतात. तसेच गाई असतील तर शेतात खताची कमी पडत नाही. त्यामुळे अशा गाईला निरोप देणे बळीराजासाठी अत्यंत हळवा क्षण असतो. त्याच हळवेपणातून या कुटुंबाने ही संवेदनशीलता दाखवली आहे.