AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई अंथरुणावर खिळलेली, वडील चप्पल जोडे शिवणारे, मुलीनं काढलं नाव

दोन खोल्यांच्या घरात पत्नी, एक मुलगा, दोन मुली यांच्यासह राहतात. आपल्या कुटुंबाचा गाडा चालवितात. प्रल्हाद यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले.

आई अंथरुणावर खिळलेली, वडील चप्पल जोडे शिवणारे, मुलीनं काढलं नाव
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 4:07 AM

गोंदिया : जीवनात कोणत्याही ध्येय प्राप्तीसाठी मनात प्रचंड आत्मविश्वास, जिद्द असणे आवश्यक आहे. दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या खुशबू प्रल्हाद बरैय्या या 25 वर्षीय युवतीने स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं. कोणतेही वर्ग न लावता गावामध्ये राहून नियमित अवांतर अभ्यास केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. तिच्या अथक परिश्रमाला यश मिळाले. चप्पल-जोडे शिवणाऱ्याची मुलगी खुशबू आता पोलीस उपनिरीक्षक होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ मुख्य परीक्षा 2020 अंतर्गत पोलीस उपनिरीक्षकपदाची यादी जाहीर करण्यात आली. त्यात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील खुशबू प्रल्हाद बरैय्या या 25 वर्षीय युवतीने 364 गुण मिळवले. पोलीस उपनिरीक्षक पदावर आपले स्थान निश्चित केले. खुशबूच्या या असामान्य यशाबद्दल तिचे कौतुक केले जात आहे.

आई अंथरुणाला खिळलेली

खुशबूचे वडील प्रल्हाद बरैय्या हे अर्जुनी शहराच्या ठिकाणी लहानसे दुकान थाटून चप्पल, जोडे शिवण्याचे काम करतात. दोन खोल्यांच्या घरात पत्नी, एक मुलगा, दोन मुली यांच्यासह राहतात. आपल्या कुटुंबाचा गाडा चालवितात. प्रल्हाद त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. पत्नी आजारी असूनही मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. शिक्षणापासून प्रगती नाही याची जाण त्यांना वेळोवेळी होती. त्यांनी तिन्ही मुलांच्या शिक्षणात कोणतीही उणीव भासू दिली नाही. आपले मुले शिक्षण घेऊन शासकीय पदावर कार्यरत राहावे, अशी त्यांची अपेक्षा होती. ती आता पूर्ण झाल्याचं वडील प्रल्हाद बरैय्या आणि भाऊ अनमोल बरैय्या यांनी सांगितले.

Gondia 2 n

भाऊ पोहचवून द्यायचा डबा

घरामध्ये अभ्यासासाठी सोय नसतानासुद्धा खुशबूने स्वत: कष्ट केले. स्पर्धा परीक्षेचे कोणतेही वर्ग न लावता एमपीएससीसाठी शहरात जाऊन अभ्यास वर्गाचा आग्रह केला नाही. सरकारी नोकरी करायची हा एकच ध्यास मनामध्ये होता. नियमित अभ्यास, अवांतर वाचनाने यश संपादन केले. अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनच्या वाचनालयात खुशबूने आपले यशस्वी भविष्य घडविले.

नित्यनेमाने सकाळी आठ वाजता खुशबू वाचनालयात जायची. भाऊ तिला जेवणाचा डबा नेऊन द्यायचा. एकदा सकाळी वाचनालयात गेल्यावर संध्याकाळी यायची. असा संघर्ष करत तिने एमपीएससी परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.