Gondia Crime | धक्कादायक! गोंदियात अर्धनग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह, चेहरा जाळून ओळख मिटविण्याचा प्रयत्न

गोंदिया जिल्ह्यातील जंगलात एका युवतीचा मृतदेह सापडला. या युवतीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाय चेहरा जाळून ओळख मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Gondia Crime | धक्कादायक! गोंदियात अर्धनग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह, चेहरा जाळून ओळख मिटविण्याचा प्रयत्न
गोंदियात अर्धनग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह सापडलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 12:10 PM

गोंदिया : जिल्ह्यातील आमगाव तालुक्या अंतर्गत कुंभारटोलीलगत (Kumbhartoli) जंगल परिसर आहे. या परिसरात एका पंधरा-सोळा वर्षीय तरुणीचा आज सकाळी मृतदेह सापडला. चेहरा जाळून तिची ओळख मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृतदेह जंगल परिसरात फेकून देण्यात आला. आज सकाळी कुंभारटोली गावातील काही लोक जंगल परिसरात सरपण वेचण्यासाठी गेले होते. गावकऱ्यांना युवतीचा मृतदेह दिसला. घटनेची माहिती आमगाव पोलिसांना (Amgaon Police) दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनाकरिता आमगावचे ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) पाठविले. ही घटना काल रात्री घडली. काही अज्ञान इसमांनी या तरुणीवर अत्याचार केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर पळ काढला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आमगाव पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

अशी उघडकीस आली घटना

आज सकाळी कुंभारटोलीचे काही जण जंगलात सरपणासाठी गेले होते. तेव्हा त्यांना तिथं अर्धनग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह सापडला. ही घटना पाहून त्यांना धक्काच बसला. शेवटी त्यांनी या घटनेची माहिती आमगाव पोलिसांना दिली. आमगाव पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

जंगलात फेकला मृतदेह

या घटनेचा तपास करण्यासाठी श्वानपथक बोलावण्यात आलंय. गुन्हे शाखेचे पोलीस गोंदियावरून आले आहेत. आरोपींनी तिची हत्या केल्यानंतर तिचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला. काल रात्रीच ही धक्कादायक घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही तरुणी कुठली आहे. तिची हत्या का करण्यात आली, हे सर्व प्रश्न सध्यातरी निर्माण झाले आहेत. आमगाव पोलीस याचा तपास करत आहे. कुठल्या पोलीस ठाण्यात तरुणीची मिसिंग तक्रार आहे का, याची माहिती मागविली जात आहे.

Nagpur : नागपूरमध्ये विनाहेल्मेट सरकारी बाबूंवर आजपासून कारवाई, राज्याच्या परिवहन आयुक्तांचे आदेश

Amravati | अचलपूरमधील दोन गटांतील दगडफेक प्रकरण, भाजप शहराध्यक्ष अभय माथनेला तीन दिवस पोलीस कोठडी

Video Nagpur Fire | नागपुरात भरदुपारी दुचाकी पेटली; महाकाली चौकात धुराचे लोळ

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.