Gondia forest | गोंदियात तेंदुपत्ता संकलनावरून वाद, गावकरी-वन विभागात जुंपली; उपोषणाचा सहावा दिवस, दोघांची प्रकृती खालावली

खासगी ठेकेदारही अवैध वाहतूक करतात. त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही, अशा प्रश्न हेमराज पुस्तोडे, रतीराम राणे, जीजा मांडले व इतर ग्रामस्थ वन अधिकऱ्यांना करत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश गावांना नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सीमा लागून आहे. कोअर भागात तेंदुपत्ता संकलनाची परवानगी नसली तरी बफर भागात परवानगी आहे.

Gondia forest | गोंदियात तेंदुपत्ता संकलनावरून वाद, गावकरी-वन विभागात जुंपली; उपोषणाचा सहावा दिवस, दोघांची प्रकृती खालावली
गावकरी-वन विभागात जुंपली; उपोषणाचा सहावा दिवसImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 4:27 PM

गोंदिया : जिल्ह्याच्या सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या जंगलात तेंदुपत्ता मोठ्या प्रमाणात आले. हा तेंदुपत्ता संकलनाच्या मागणीकरिता वन विभाग आडकाठी आणत आहे. त्यामुळं ग्रामस्थ बेमुदत उपोषणाला (Fasting) बसले आहेत. आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. दोघांची प्रकृती खालविली. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ग्रामीण भागातील लोकांची उपजीविका ही जंगलावर (Jungle) आणि शेतीवर अवलंबून आहे. 2006 च्या शासन परिपत्रकानुसार गावाशेजारी असलेली जंगले ही ग्रामसभेला वन हक्क कायद्या अंतर्गत देण्यात आली. याच जंगलातून वन गौण उपज जमा केला जातो. ग्रामस्थ (Villagers) आपला उदरनिर्वाह करीत असतात. मात्र, सध्याच्या घडीला तेंदुपत्ता संकलनाचे कामे सुरु आहे.

वाहतुकीची गाडी कशी अडवली

गावालगत असलेल्या राखीव जंगलातून गावकरी तेंदुपत्ता संकलन करतात. वन विभाग अडवीत असल्याने पंढरवानी आणि गोठणगावातील लोकांनी आमरण उपोषणाला सुरवात केली. मात्र वन अधिकारी 2006 चा जीआर आम्हाला मान्य नसल्याचे सांगतात. गावकरी आणि वन विभागामध्ये संघर्ष पेटला आहे. तेंदुपत्ता संकलनाची आणि वाहतुकीची परवानगी द्यावी, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या गोठणगावातील वन समितीने गावाशेजारी असलेल्या जंगलातून तेंदुपत्ता गोळा केला. त्यांना वन विभागाने अडविले नाही. मात्र वन व्यवस्थापन समितीची तेंदुपत्ता वाहतूक करीत असलेली गाडी अडविण्यात आली. ही गाडी गोंदियात जात असताना वन अधिकाऱ्यांनी अतिरिक्त माल वाहतूक करीत असल्याचे कारण दाखवित ताब्यात घेतली. त्यामुळं गावकरी उपोषणाला बसलेत.

खासगी ठेकेदारांना परवानगी कशी?

खासगी ठेकेदारही अवैध वाहतूक करतात. त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही, अशा प्रश्न हेमराज पुस्तोडे, रतीराम राणे, जीजा मांडले व इतर ग्रामस्थ वन अधिकऱ्यांना करत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश गावांना नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सीमा लागून आहे. कोअर भागात तेंदुपत्ता संकलनाची परवानगी नसली तरी बफर भागात परवानगी आहे. मात्र 2006 च्या शासन परिपत्रकात कोअर आणि बफर भागाचा उल्लेख नाही. गावाशेजारी असलेल्या जंगलातून वन गौण उपज जमा करण्याचे अधिकार ग्राम सभेला दिले आहेत. मात्र वन अधिकारी याला मान्य करीत नसल्याने हा संघर्ष पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.