गोंदिया : राज्यात जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावलीयं. मुंबई, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळतोयं. पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जातंय. मात्र, या सततच्या पावसामुळे पाणी (water) पातळीत मोठी वाढ झालीयं. राज्यातील जवळपास सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग देखील सुरूयं. मुंबई, नागपूर, अमरावती आणि पुणे येथे प्रशासनाकडून अलर्ट देखील जाहिर करण्यात आले असून नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन केले जातंय. गोदिंया (Gondia) येथील पुजारी टोला धरणाचे देखील सर्वच 13 दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलायं. धरण सुस्थितीत नियंत्रणाकरीता सुरू असलेल्या 13 गेट पैकी सध्या 13 गेट वक्रद्वार सुरु करण्यात आली असून यात 8 गेट 0.60 मि ने ते 5 गेट 0.30 मी. नी सुरू आहे. यामधून 453 क्युमेक (16000 क्युसेक) विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
गोदिंया येथे धरण पानलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होत असल्याने धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते आहे. यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून धरणाचे 13 दरवाजे हे उघडण्यात आले आहेत. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होतेयं. नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा हा देण्यात आला आहे.