Gondia Administration | गोंदियातील मजुरांच्या घरांचे छत गेले, झोपड्यांवर प्रशासनाने चालविला बुलडोजर, रेल्वे पुलाखालील 50 कुटुंब उघड्यावर

शहराच्या मुख्य मार्गावरील रेल्वेच्या पुलाखाली जवळपास 50 कुटुंब गेल्या 50 वर्षापासून घरे बांधून राहत आहेत. लहान उड्डाणपुलाची मुदत संपली. तो पूल पाडण्याचे काम आता सुरू आहे. मात्र या पुलाखाली राहणारे 50 कुटुंबीयांची घरे पोलीस संरक्षणात बुलडोजरने पाडण्यात आली.

Gondia Administration | गोंदियातील मजुरांच्या घरांचे छत गेले, झोपड्यांवर प्रशासनाने चालविला बुलडोजर, रेल्वे पुलाखालील 50 कुटुंब उघड्यावर
गोंदियातील मजुरांच्या घरांचे छत गेले, झोपड्यांवर प्रशासनाने चालविला बुलडोजरImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 10:33 AM

गोंदिया : गोंदिया शहरातील लागूनच रेल्वेच्या पुलाच्या खाली जवळपास 50 कुटुंब शहरात भांडे, कपडे, धुण्याचे आणि साफसफाई करण्याचे काम करतात. मजूर वर्ग निवारा नसल्याने पुलाखाली (Pools) गेल्या 40 ते 50 वर्षांपासून वास्तव करीत आहे. मात्र, लहान पुलाच्या पाडण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या झोपड्यांवर बुलडोजर काल चालविण्यात आला. अचानकपणे कुटुंबावर बेघर ( Homeless) होऊन रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत या कुटुंबांनी शासनाच्या विविध योजनांचा (Government schemes) लाभ घेतला. आता आम्ही कुठे जाऊ अशी आर्त हाक लहान मुलांपासून तयार वयस्क महिला करीत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण (Education) या मूलभूत गरजा आहेत. आज या कुटुंबावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. सरकारने तर त्यांची घरे मात्र आता या कुटुंबांना निवाऱ्याची सोय होणार की नाही, हे सर्व कुटुंब जाणार कुठे? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यावेळी बब्बू पठाण, संतोष डोंगरे, साधना डोंगरे व किरण देशमुख यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

पोलीस संरक्षणात पाडली घरं

शहराच्या मुख्य मार्गावरील रेल्वेच्या पुलाखाली जवळपास 50 कुटुंब गेल्या 50 वर्षापासून घरे बांधून राहत आहेत. लहान उड्डाणपुलाची मुदत संपली. तो पूल पाडण्याचे काम आता सुरू आहे. मात्र आज या पुलाखाली राहणारे 50 कुटुंबीयांची घरे पोलीस संरक्षणात बुलडोजरने पाडण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर आता आपल्या मुलाबाळासह उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. यादरम्यान लहान पुलाखाली तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. आक्रमक झालेल्या बेघर कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यात ठिय्या मांडण्याचा निर्धार केलाय.

दुसरीकडं रोजगार कुठे मिळविणार

आता या मजुरांसमोर निवाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. प्रशासनानं कुठतरी राहण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. रस्ता बनावा, विकास व्हावा. पण, मजुरांच्या निवाऱ्याची व्यवस्था दुसरीकडं जवळपास कुठतरी करून द्यावी. कारण आम्ही गेल्या पन्नास वर्षांपासून येथे राहतो. आता जाणार कुठं असा प्रश्न त्यांच्यापुढं निर्माण झाला. दुसरीकडं गेल्यास रोजगार कुठे मिळणार. मुलांच्या शिक्षणाचं काय करावं, असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढं निर्माण झालेत.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.