यांनीच खुपसला भाजपच्या पाठीत खंजीर, चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल

त्यांनी अडीच वर्ष थांबावं आणि जनतेमध्ये जावं तेव्हा त्यांना कळेल.

यांनीच खुपसला भाजपच्या पाठीत खंजीर, चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल
चंद्रशेखर बावनकुळे यांची भविष्यवाणी
Follow us
| Updated on: Oct 12, 2022 | 8:07 PM

शाहिद पठाण, TV9 मराठी, प्रतिनिधी, गोंदिया : उद्धव ठाकरे गटाने भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसून राज्यातील जनतेशी बेईमानी केली. असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे गटाने भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खूपसून राज्यातील जनतेशी बेईमानी केली. जनतेचा मताचा अनादर करीत भाजपासोबतची युती तोडली. राष्ट्रवादीची घडी आणि काँग्रेसचा पंजाच पकडला नाही तर विचारही पकडले. एवढेच नव्हे तर हिंदूत्वाचे विचार सोडून काँग्रेस – राष्ट्रवादीच्या विचारवर गेले आहेत. म्हणून भाष्कर जाधवांना असे बोलण्याचा अधिकार नाही. असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी भाष्कर जाधवांना लगावला. ते गोंदियात पत्रकारांशी बोलत होते.

सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे अत्यंत वाईट परीस्थितीमध्ये आलेले आहेत. त्यांनी अडीच वर्ष थांबावं आणि जनतेमध्ये जावं तेव्हा त्यांना कळेल. दररोज लोक त्यांना सोडून जात आहेत. त्यामुळे त्यांनी संयम पाळावा.

आता त्यांनी हातामधी मशाल पकडली आहे. पंजा आहे आणि वरून शरद पवार त्यात तेल ओतण्याचे काम करत आहेत. 2024 मशाल चिन्हाची जमानत जप्त होणार, अशी भविष्यवाणीचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्तविली.

उद्धव ठाकरे आपला दिवसभरातील राग सामनाच्या माध्यमातून व्यक्त करतात. ज्या ज्या वेळी ते अस्वस्थ होतात. तेव्हा ते काही तरी लिहीतात आणि सामना ते छापतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सिरीयस घेण्याची गरज नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

राज ठाकरे यांनी कोणती भूमिका घ्यावी हे ते व त्यांच्या मनसे पक्ष यांच्या हा अधिकार आहे. असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. ते शिंदे व ठाकरे यांना करण्यात आलेल्या चिन्ह वाटपबाबत अद्यापही बोलले नाही.

या प्रश्नावर ते बोलत होते. आमची राज ठाकरेंबरोबर युती नाही. आमची फक्त शिंदे गटासोबत सोबत युती आहे, हे बावनकुळे सांगायला विसरले नाही.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.