Bhandara-Gondia ZP Election | ओबीसी जागा खुल्या प्रवर्गातून, तरीही कोणते राजकीय पक्ष देणार ओबीसी उमेदवारांनाच संधी?

18 जानेवारीला मतदान होणाऱ्या जागांसाठी बहुतेक सर्व राजकीय पक्ष ओबीसी उमेदवारांनाच उमेदवारी देण्याचे सांगत आहेत. पण, प्रत्यक्षात काय होते, ते पाहावे लागले.

Bhandara-Gondia ZP Election | ओबीसी जागा खुल्या प्रवर्गातून, तरीही कोणते राजकीय पक्ष देणार ओबीसी उमेदवारांनाच संधी?
Z P BHANDARA
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 1:40 PM

नागपूर : भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे मतदान दोन टप्प्यात होईल. 21 डिसेंबरला जुन्या ओबीसी आरक्षित जागा वगळून मतदान होईल. तर दुसऱ्या टप्प्यात ओबीसींच्या राखीव जागेवर खुल्या प्रवर्गातून 18 जानेवारीला मतदान होईल. त्यानंतर 19 जानेवारी रोजी मतमोजणी होईल. 18 जानेवारीला मतदान होणाऱ्या जागांसाठी बहुतेक सर्व राजकीय पक्ष ओबीसी उमेदवारांनाच उमेदवारी देण्याचे सांगत आहेत. पण, प्रत्यक्षात काय होते, ते पाहावे लागले.

काँग्रेस-भाजप देणार ओबीसींनाच संधी

ओबीसी आरक्षित जागा अनारक्षित झाल्याने त्या जागांवर ओबीसी उमेदवारांनाच तिकीट देऊ, अशी भूमिका काही राजकीय पक्षांनी घेतली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिर्‍हेपुंजे यांनी अनारक्षित झालेल्या जागांवर ओबीसी उमेदवारांनाच संधी देऊ, अशी भूमिका मांडली. तर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनीसुद्धा अनारक्षित झालेल्या जागांवर ओबीसींना उमेदवारी देण्याचे स्पष्ट केले. असे असले तरी आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजामध्ये केंद्र आणि राज्य शासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. आरक्षणाची मागणी जोर धरत असल्याने त्याचे परिणाम निवडणुकीवर ठळकपणे दिसणार आहेत.

भाजपचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

भंडारा जिल्ह्यात खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे नेते प्रचार सभा घेत आहेत. भाजप डोअर टू डोअर प्रचारात व्यस्त आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढत आहे. महाविकास आघाडी आपल्या विकास कामांना घेऊन मैदानात उतरली आहे. भंडारा जिल्हा परिषदेत आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळं जिल्ह्याचा विकास खुंटला असून यावेळी जनता परिवर्तन करेल अशी अशा भाजपचे उमेदवार सतीश चौधरी यांना आहे.

पटोले, भुजबळ म्हणतात, ओबीसी उमेदवारच देणार

ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस खुल्या प्रवर्गातील जागेवर देखील ओबीसी उमदेवार देणार असल्याचं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं. तुम्हीदेखील खुल्या प्रवर्गातील जागेवर ओबीसी उमेदवार द्या अशी मागणी भुजबळ यांनी भाजपला केली आहे. तुमच्याच सरकारने ओबीसी समाजावर अन्याय केला असून तुम्हीच राजीनामा द्यावा अशी मागणी छगन भुजबळांनी गोंदियात आयोजित पत्रपरिषदेच्या माध्यमातून आशिष शेलार यांना केली आहे.

भंडाऱ्यात 13 जि.प., तर 25 पं. स.च्या जागांसाठी मतदान 18 ला

भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 52 सदस्यसंख्या असलेल्या भंडारा जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण अशा 39 पदांकरिता 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर नामाप्रतून अनारक्षित झालेल्या 13 जागांसाठी 18 जानेवारी रोजी मतदान होईल. पंचायत समितीच्या 25 जागांसाठी मतदान 18 जानेवारीला होईल. गोंदिया जिल्हा परिषदेच्या 53 व पंचायत समितीच्या 106 जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र, 27 टक्के आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं ओबीसीच्या 30 जागा वगळून 21 डिसेंबरला मतदान होईल.

प्रशासनाचा भर ओबीसींना शांत करण्यावर

नामाप्रतून सर्वसाधारणमध्ये बदललेल्या जागांवर ओबीसींनी आपला हक्क कायम ठेवला आहे. तशी तयारीसुद्धा ओबीसी उमेदवारांनी केली आहे. परंतु, ऐनवेळी पक्षाची काय भूमिका ठरते, याकडेही उमेदवारांचे लक्ष आहे. सर्वसाधारण जागा झाल्याने बहुतांश उमेदवारांच्या नजरा या जागांकडे वळल्या आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे साकडे घातले जात आहे. भंडारा तालुक्यातील पिपरीसह अन्य गावांमध्ये घरांवर निवडणुकीवर बहिष्काराच्या पाट्या लावल्या जात आहेत. गावोगावी ओबीसी समाजाच्या बैठका सुरू झाल्या आहेत. निवडणुकीवर बहिष्काराबाबत चर्चा होत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी अशा गावांमध्ये भेटी देत आहेत.

Science Fair | चला मैत्री करू विज्ञानाशी; नागपुरातील 200 विद्यार्थ्यांचे 100 प्रयोग

Nagpur | दोन ज्येष्ठांच्या अवयवदानातून सहा जणांना नव’जीवन’; मुलींच्या पुढाकारातून वडिलांचे अवयवदान

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...