Gondia ACB : तिरोडा पंचायत समितीच्या दोघांनी मागितली लाच, असे अडकले एसीबीच्या जाळ्यात…

तिरोडा पंचायत समितीच्या दोन अधिकाऱ्यांनी लाच मागितली. एका आरोपीस अटक करण्यात आली, तर दुसरा फरार झाला. गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

Gondia ACB : तिरोडा पंचायत समितीच्या दोघांनी मागितली लाच, असे अडकले एसीबीच्या जाळ्यात...
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 7:12 PM

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा पंचायत समितीमध्ये (Panchayat Samiti) विस्तार अधिकारी पदावर कार्यरत तक्रारकर्त्यांची वैद्यकीय रजेची (Medical Leave) फाईल मंजूर करायची होती. यासाठी वरिष्ठ सहायक व सहायक प्रशासक अधिकारी या दोघांनी 17 हजार रुपयांची लाच (bribe) मागितली. मात्र सापळ्यादरम्यान संशय बळकाविल्याने आरोपींनी लाच घेण्यास नकार दिला. पदाचा दुरुपयोग करून लाचेची मागणी केल्याची बाब निष्पन्न झाली. गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली, तर दुसरा आरोपी फरार झाला आहे. प्रमोद सदाशिव मेश्राम (49) वरिष्ठ सहाय्यक असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रदीप बन्सोड सहायक प्रशासन अधिकारी असे फरार आरोपीचे नाव आहे.

17 हजार रुपयांची मागितली लाच

तिरोडा पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी पदावर कार्यरत तक्रारकर्त्याची प्रकृती बिघडली. त्यांनी वैद्यकीय रजा घेतली होती. नियमानुसार तक्रारकर्त्याने वैद्यकीय रजेची फाईल पंचायत समितीच्या प्रशासन विभागाकडे सादर केली. वैद्यकीय रजेची फाईल मंजूर करून देण्यासाठी वरिष्ठ सहायक प्रमोद मेश्राम व सहाय्यक प्रशासक अधिकारी प्रदीप बन्सोड हे दोघे जण टाळाटाळ करीत होते. तक्रारकर्त्यानी आरोपींशी संपर्क साधला. प्रशासक अधिकाऱ्याचे 10 हजार व वरिष्ठ सहाय्यकाचे 7 हजार असे एकूण 17 हजार रुपयांची लाच मागितली. मात्र तक्रारकर्त्यास लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळं त्यांनी गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गाठत तक्रार दिली.

असा रचला सापळा

यावरून सात सप्टेंबर रोजी सापळा रचण्यात आला. मात्र, आरोपी वरिष्ठ सहायक प्रमोद मेश्राम याला संशय बळकाविल्याने त्याने लाच घेण्यास नकार दिला. तर दुसरीकडे या प्रकाराची माहिती मिळताच आरोपी सहायक प्रशासन अधिकारी प्रदीप बन्सोड हा कार्यालयातून फरार झाला. दोन्ही आरोपी संगनमत करून लाच मागत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तिरोडा पोलीस ठाण्यात आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी वरिष्ठ सहायक प्रमोद मेश्राम याला अटक करण्यात आली आहे. फरार आरोपीचा शोध सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.