Gondia Accident : गोंदियात अज्ञात वाहनाच्या धडकेत राज्य राखीव पोलिस दल जवानाचा मृत्यू
देवरी तालुक्याला लागून असलेल्या भागी गावातील विजय ऊईके हे राज्य राखीव पोलीस दल बटालियन गोंदीयामध्ये आज कार्यरत होते. यासाठी आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या मोटारसायकलवरुन ड्युटी करण्यासाठी चालले होते. यावेळी आमगाव तालुक्यातील अंजोरा गावाजवळ त्यांच्या बाईकला पाठिमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाला धडक दिली.
गोंदिया : ड्युटीवर चाललेल्या राज्य राखीव दला (SRPF)च्या जवानाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात घडली आहे. विजय उईके (Vijay Uike) असे मयत सीआरपीएफ जवानाचे नाव आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात विजय उईके या जवानाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी वाहन चालक आपले वाहन घेऊन घटनास्थळावरुन फरार झाला. या प्रकरणी आमगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे भागी गावाववर शोककळा पसरली आहे. उईके हे सकाळच्या सुमारास आपल्या देवरी भागी या गावातून गोंदिया येथे ड्युटीवर चालले होते. (State Reserve Police Force personnel killed in Gondia collision)
गोंदियात ड्युटीवर चालले होते मयत जवान
देवरी तालुक्याला लागून असलेल्या भागी गावातील विजय ऊईके हे राज्य राखीव पोलीस दल बटालियन गोंदीयामध्ये आज कार्यरत होते. यासाठी आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या मोटारसायकलवरुन ड्युटी करण्यासाठी चालले होते. यावेळी आमगाव तालुक्यातील अंजोरा गावाजवळ त्यांच्या बाईकला पाठिमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाला धडक दिली. या अपघातात उईके यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आमगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
पुण्यात पिकअप गाडीचा टायर फुटून भीषण अपघात
बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या पिकअप वाहनाला भीषण अपघात होऊन यात एक जण जागीच ठार झाला, तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना पुण्यात घडली. मावळ तालुक्यातील नानोली येथे बैलगाडा शर्यत होती. ही शर्यत पाहण्यासाठी 16 ते 17 तरुण पिकअप वाहनातून गेले होते. शर्यत पाहून परत येत असताना बेल्हा जेजुरी महामार्गावर लोणी येथे पिकअप गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात घडला. आकाश लोणकर असे मृत तरूणाचे नाव असून तो अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील शिरपूर गावचा रहिवासी आहे. तर जखमी तरुण पिंपरखेड चोंभुत शिरपूर परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (State Reserve Police Force personnel killed in Gondia collision)
इतर बातम्या
VIDEO : सोलापूरमध्ये व्यापाऱ्याकडे सिनेस्टाईल खंडणीची मागणी, घटना कॅमेऱ्यात कैद
Pune crime |पुण्यात मोह माया महागात, कॉल गर्लनं गंडवलं, व्यापाऱ्याचे 60 लाख उडाले