Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : गोंदियात धावती ट्रेन पकडता पकडता तोल सुटला; महिला पडणार एवढ्यात जवान आला मदतीला धावून…

गोंदियाच्या जवानांनी ऑपरेशन जीवन रक्षा अंतर्गत केलेले कार्य कौतुकास्पद आहे. धावत्या ट्रेनमधून महिला खाली पडत असताना धक्का देत सुखरूप डब्ब्यात पोहचविले. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

Video : गोंदियात धावती ट्रेन पकडता पकडता तोल सुटला; महिला पडणार एवढ्यात जवान आला मदतीला धावून...
गोंदिया रेल्वेस्थानकावरील घटना
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 6:01 AM

गोंदिया : गोंदिया रेल्वेस्थानकावर एका महिलेचे प्राण वाचविण्यात आरपीएफ जवानाला (RPF Jawan) यश आले. गोंदिया रेल्वे स्टेशनमध्ये ट्रेन क्रमांक 12833 गोंदिया स्थानकावर (Gondia Railway Station) आली. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर 8:22 वाजता पोहचली. गाडी प्लॅटफॉर्मवरून सुरू झाली. त्याचवेळी चालत्या ट्रेनमध्ये (Dhavati Train) एक महिला प्रवासी चढण्याचा प्रयत्न करत होती. परंतु, तिचे संतुलन बिघडले. त्यामुळं ती महिला खाली पडण्याची शक्यता होती. ड्युटीवर असलेले कॉन्स्टेबल डी. के. लिल्हारे यांच्या ही बाब लक्षात आली. ते धावत महिलेच्या दिशेने गेले. रेल्वेतून ती खाली पडेल, अशात तिला रेल्वेत ढकलले. यामुळं तीम महिला रेल्वेत सुखरूप पोहचली. या जवानाने जीवाची पर्वा न करता ही कामगिरी केली.

घटना सीसीटीव्हीत कैद

व्हिडिओमध्ये ही घटना कैद झाली. हा अपघात होता होता थोडक्यात बचावला. जवानाने प्रसंगावधान साधून महिलेचे प्राण वाचविले. त्यामुळं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. cctv कव्हरेजवरच्या अधिकार्‍यांना पाठवण्यात आले. त्यांनीही जवानाने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. जवान धावत गेले नसते, तर कदाचित या महिलेला रेल्वेच्या ट्रकखाली यायला वेळ लागला नसता. गोंदियाच्या जवानांनी ऑपरेशन जीवन रक्षा अंतर्गत केलेले कार्य कौतुकास्पद आहे. धावत्या ट्रेनमधून महिला खाली पडत असताना धक्का देत सुखरूप डब्ब्यात पोहचविले. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

नियमांचे पालन करण्याचे आवाहन

अशाच प्रकारची घटना महिनाभरापूर्वी घडली होती. गोंदिया रेल्वेस्थानकावर कधीकधी रेल्वेत बसण्यासाठी गर्दी असते. ट्रेन सुटू नये, म्हणून काही प्रवासी धावत -धावत जातात. अशावेळी अशा दुर्घटना घडण्याची शक्यता असते. पण, आरपीएफचे जवान या सर्व घटनांवर लक्ष ठेवून असतात. त्यांच्यामुळं काही प्रवाशांचे प्राण वाचण्यास मदत होते. जवान आपले रक्षण करतात. त्यामुळं त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. रेल्वेतून जाताना नियमांचे पालन केल्यास अपघात कमी होतील, असं रेल्वेच्या स्टेशन मास्टरांनी सांगितलं.

Nagpur NMC | मनपाच्या स्थायी समितीकडून यंदाही करवाढ नाही, प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहाकडे पाठविला

Nagpur Crime | एकटी पाहून मध्यरात्री घरात घुसले; चाकूच्या धाकावर 58 वर्षीय महिलेवर दोघांकडून बलात्कार, नागपुरात चाललंय काय?

Wardha | कर्जबाजारी झाल्यानं नवरा-बायको दोघांनीही विष घेतलं!, उपचारादरम्यान नवरा दगावला, पण पत्नी वाचली

'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा.
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.