Nagzira tiger | नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात येणार चार वाघिणी, वन विभागाचा निर्णय, राज्यातील पहिलाच प्रकल्प

या वाघिणी दीड ते दोन वर्षांच्या असून या वाघिणींना काही दिवस खुल्या पिंजर्‍यात ठेवण्यात येईल. मग रेडिओ कॉलर लावून नवेगाव-नागझिरा व्याघ प्रकल्पात सोडले जाईल. बिलाल हबीब हा संपूर्ण प्रकल्प हाताळत आहेत. स्वयंसेवी संस्थांचीही यासाठी मदत घेतली जात असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Nagzira tiger | नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात येणार चार वाघिणी, वन विभागाचा निर्णय, राज्यातील पहिलाच प्रकल्प
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात येणार चार वाघीणImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 5:06 PM

गोंदिया : व्याघ दर्शनासाठी गोंदिया जिल्ह्यातील नावेगाव-नागझिरा व्याघ प्रकल्प (Tiger Project) परिचित आहे. व्याघ संवर्धनातील स्थानांतरणाच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी (Bramhapuri) येथील चार वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ प्रकल्पात सोडण्याचा निर्णय झालाय. राज्याच्या वनविभागाने (Forest Department) हा निर्णय घेतला आहे. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. मे महिन्याच्या अखेरीस यातील दोन वाघिणींना या व्याघ प्रकल्पात सोडण्याचे संकेत वनखात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले. नवेगाव-नागझिरा व्याघ प्रकल्पात वाघ आणि वाघिणींची संख्या समांतर नाही. त्यामुळे येथे चार वाघीण सोडून ही संख्या समांतर करण्यासाठी निर्णय घेण्यात आले.

स्वयंसेवी संस्थांची मदत

या वाघिणी दीड ते दोन वर्षांच्या असून या वाघिणींना काही दिवस खुल्या पिंजर्‍यात ठेवण्यात येईल. मग रेडिओ कॉलर लावून नवेगाव-नागझिरा व्याघ प्रकल्पात सोडले जाईल. बिलाल हबीब हा संपूर्ण प्रकल्प हाताळत आहेत. स्वयंसेवी संस्थांचीही यासाठी मदत घेतली जात असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

नागझिऱ्यात येणार चैतन्य

वाघांचा जंगलात एक विशिष्ट प्रदेश असतो. हे वाघ नवीन आल्यावर त्यांना स्वतःचा प्रदेश तयार करावा लागेल. तसंच नागझिरा जंगलात वाघांची संख्या कमी आहे. ब्रम्हपुरी, ताडोबात वाघांनी धुमाकूळ घातला आहे. एकदोन दिवसाआड एखाद्या व्यक्ती वन्यप्राण्यांच्या शिकारीचा बळी पडत आहे. अशावेळी नवीन जंगलात सोडल्यास त्यांना जंगलात प्रमाणात खाद्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळं समतोल राखण्याचा प्रयत्न होणार आहे. वाघ बघायचा असेल, तर सध्या ताडोबाची ज्यास्त क्रेझ आहे. नागझिऱ्यात येणाऱ्या पर्यटकांची निराशा होते. पण, या वाघिणी येथे आल्यानंतर पर्यटकांची निराशा होणार नाही, अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही.

हे सुद्धा वाचा

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.