वडिलांना सोडून परतत होता युवक, गोंदियाकडे येताना टिप्परखाली आला, शरीराच्या चिंधळ्याच उडाल्या!
गोंदियात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. आमगाव तालुक्यातील दहेगाव येथे ही घटना घडली. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला.
गोंदिया : आमगाव-गोंदिया महामार्गवरील (Amgaon-Gondia Highway) सध्या रस्ताचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर अपघात होत असतात. आज दहेगाव येथे ट्रक व दुचाकी अपघातात एका युवकांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. गोंदियातील शास्त्री वॉर्डातील (Shastri Ward in Gondia) दिनेश चंद्रप्रकाश पहिरे (वय 24) असं मृतकाचं नाव आहे. आमगाव गोंदिया महामार्गावरून टिप्पर एमएच 25 एजे 2644 आमगावकडून गोंदिया जात होता. त्याचवेळी ट्रकच्या पाठीमागून दुचाकी एमएच 35 यु 2552 येत होती. ओहरटेक करीत असताना दुचाकी चालक खाली पडला. ट्रकच्या मागील चाकात आल्यामुळे दिनेश पहिरे याचा जागीच मृत्यू झाला. टिप्पर चालक हा टिप्पर जागेवर सोडून फरार झाला. तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे (Police Inspector Vilas Nale) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
असा झाला अपघात
दिनेश दुचाकीने गोंदियाकडे जात होता. तत्पूर्वी त्याने आपल्या वडिलांना आमगाव येथे सोडले होते. रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने समोर जाण्यास अडचण होती. टिप्परला ओव्हरटेक करण्याचा त्याने प्रयत्न केला. पण, टिप्परखाली आला. टिप्परच्या मागच्या चाकाखाली आल्याने दिनेशच्या शरीराच्या अक्षरशः चिंधळ्या उडाल्या. त्याच्या शरीराचे तुकडे झाले.
रेल्वेखाली आल्याने युवकाचा मृ्त्यू
दुसरी घटना, सालेकसा तालुक्यातील धनसुवाबोरे येथे घडली. तीस वर्षीय युवक रेल्वे लाईनवर कटलेल्या अवस्थेत सापडला. चार मार्च रोजी ही घटना उघडकीस आली. तपास पोलीस हवालदार संजय चौबे करीत आहेत. स्टेशन मास्टर यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
चोरीचे दागिने विकण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला, कल्याण क्राईम ब्रांचची कारवाई