आकाशात उडालेले प्रशिक्षणार्थी विमान १०० फूट दरीत कोसळले; वैमानिक बनण्याचे स्वप्न अपुरेचं राहिले

बिरसी येथील विमानतळाहून तीनच्या सुमारास विमान उडाले. त्यात पायलट आणि प्रशिक्षणार्थी महिला होती. त्यानंतर पंधरा मिनिटांनी हे विमान क्रॅश झाले.

आकाशात उडालेले प्रशिक्षणार्थी विमान १०० फूट दरीत कोसळले; वैमानिक बनण्याचे स्वप्न अपुरेचं राहिले
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 7:48 PM

गोंदिया : बिरसी येथील विमानतळाहून तीनच्या सुमारास विमान उडाले. त्यात पायलट आणि प्रशिक्षणार्थी (Trainee) महिला होती. त्यानंतर पंधरा मिनिटांनी हे विमान क्रॅश (Plane crash) झाले. हे विमान दोन पहाळांच्या मध्य भागात जळताना दिसले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी रवाना झाले. ही दुर्घटना बालाघाट (Balaghat) जिल्ह्यातील लांजी आणि किरणापूरच्या मधात भक्कुटोला-कोसमारा पहाडीवर घडली. या घटनेत विमान क्रॅश झाला आहे. त्याठिकाणी पोहचणे कठीण आहे.

दोन पहाडांमध्ये कोसळले विमान

प्रशिक्षणार्थी पायलटचे नाव रुकशंका वरसुका आणि पायलटचे नाव मोहित आहे. बालाघाट येथील पोलीस अधीक्षक समीर सौरभ यांनी सांगितलं की, हे प्रशिक्षणार्थी विमान होते. ते गोंदियातील बिरसी विमानतळावरून उडाले होते. ही घटना बालाघाटवरून ४० किलोमीटर अंतरावर घडली. जंगलात पोहचण्यास अडचणी येत आहेत.

हे सुद्धा वाचा

विमानात होते दोन जण

गोंदियातील बिरसी विमानतळावरून उड्डाण केलेल्या प्रशिक्षण विमान उडाले. ते जवळच्या मध्य प्रदेशाच्या बालाघाट जिल्ह्यात अपघात झाला. यात पायलट आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव पायलट मोहित तर महिला प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे नाव वरसुका असे आहे. घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमाराची आहे.

१०० फूट दरीत कोसळले

बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुक्कुटोला येथे घनदाट जंगल आले. जंगलात हा अपघात झाला. जवळ-जवळ 100 फूट खोल दरीत क्रॅश झालेले विमान सापडले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच बालाघाट पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. दरीत विमान कोसळल्याने त्या ठिकाणी विमानाचे पेट घेतला. ही दरी दोन डोंगरांच्या मधात आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळा येत असल्याची माहिती आहे.

अपघाताचे कारण काय

या विमानात एक जण पायलट होता. तर दुसरी प्रशिक्षणार्थी महिला होती. तिनं वैमानिक होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण, अचानक झालेल्या या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला. अपघाताचे कारण अद्याप समोर आलं नाही. परंतु, आज दिवसा ढगाळ वातावरण होतं. त्यामुळं कदाचित हा अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.