Gondia Accident | मित्रांसोबत पोहायला गेला, कालव्यातील पाण्याचा अंदाज नाही आला; गोंदियात बुडून मुलाचा मृत्यू
अंघोळ करण्यासाठी म्हणून तो पाण्यात उतरला. कालव्यातील पाण्याचा अंदाज त्याला आला नाही. तो आणखी खोलात गेला. हातपाय मारण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात त्याला काही यश आले नाही. मित्र घाबरले. ते पळून गेले. तो कालव्यात बुडाला.
गोंदिया : कालव्यात अंगोळीला गेलेला 14 वर्षांचा मुलगा बुडून मरण पावला. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव (Arjuni Morgaon in Gondia District) तालुक्यातील नवनीतपूर येथे घडली. मृतक मुलगा हा कालव्यात अंगोळीसाठी मित्रांसोबत गेला होता. हितेश यशवंत भोयर (Hitesh Yashwant Bhoyar) असं मृतकाचं नाव आहे. तो पिंपळगाव येथील रहिवासी आहे. कालवा तुडूंब भरला होता. पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडू लागला. मुलगा बुडताना पाहून मित्रांनी गावात धूम ठोकली. गावातील लोकांना घटना सांगितली. गोंदिया येथील शोध पथकाला पाचारण करण्यात आले. हितेशचा शोध सुरू झाला. शेवटी त्याचा मृतदेहच हाती सापडला. शवविच्छेदनासाठी मोरगाव अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) दाखल करण्यात आले. हितेशच्या दुर्दैवी मृत्यूने गावात शोककला पसरली.
नेमकं काय झालं
कालची गोष्ट. उन्हामुळं शरीराची लाहीलाही होते. त्याला शांत करण्यासाठी काही मुलं कालव्यात पोहतात. पोहल्यामुळं शरीर शांत होतं. हितेशला पोहता येत नव्हतं. पण, अंघोळ करण्यासाठी म्हणून तो पाण्यात उतरला. कालव्यातील पाण्याचा अंदाज त्याला आला नाही. तो आणखी खोलात गेला. हातपाय मारण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात त्याला काही यश आले नाही. मित्र घाबरले. ते पळून गेले. तो कालव्यात बुडाला.
शोध पथकाने शोधला मृतदेह
गावात वार्ता परसली. हितेश कालव्यात बुडाला. गावकऱ्यांना कालच त्याची शोधाशोध केली. पण, कालव्यामुळं त्याचा मृतदेह वाहत गेला. त्यामुळं तो काल सापडला नाही. शेवटी गोंदियावरून शोध पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी आज हितेशच्या मृतदेहाचा शोध घेतला. ग्रामीण रुग्णालयात त्याला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. त्यामुळं पाणी आणि आग यांच्या वाटेला कुणी जाऊ नये म्हणतात. ज्याला पोहता येते त्यानेच खोल पाण्यात उतरावे. अन्यथा हितेशसारखी वेळ आल्याशिवाय राहणार नाही.