अहमदनगर: राज्यातील आघाडी सरकार हे आरक्षण विरोधी आहे. मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणावरून या सरकारने मोठं षडयंत्र रचलं आहे, असा गौप्यस्फोट करतानाच सरकारमधील मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवत असल्याचा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर चौंडी येथे आले होते. अहिल्यादेवी होळकर यांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी हा आरोप केला. (gopichand padalkar told the state government against reservation)
गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारवर टीका केली. राज्य सरकार ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे. आरक्षणावरून सरकारचं मोठं षडयंत्र आहे, अशी टीका पडळकर यांनी केली. हे सरकार निष्क्रीय आहे. कोणता निर्णय कधी घ्यायचा हे या सरकारला कळत नाही. सरकारमधील मंत्रीच आरक्षणावरून वाद पेटवत आहेत, असा आरोपही पडळकर यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेसही सत्तेसाठी लाचार आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पत्राचीही ते दखल घेत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. पदोन्नतीतील आरक्षणासाठी काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामा देऊ असा इशारा दिला होता. त्याचं काय झालं? काँग्रेस नेत्यांना कोणतीही लाज राहिली नाही. बारामतीच्या काका-पुतण्यासमोर काँग्रेसचे नेते नुसती मान डोलवत आहेत. यांचं सरकारमध्ये काहीच चालत नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
सरकारने प्रत्येक प्रश्नावर धरसोडीचं धोरण अवलंबलं आहे. राज्यासाठी हे धोरण अत्यंत घातक आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात येत्या काळात आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, आरक्षणासाठी ओबीसींनी आज राज्यभरात आंदोलन सुरू केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजाने (OBC) आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाशिकमध्ये समता परिषदेने रास्ता रोको करत आंदोलन केलं. द्वारका चौकात हे आंदोलन करण्यात आलं. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण वाचवा यासाठी आक्रोश आंदोलन करण्यात आलं. सध्या या आंदोलनासाठी स्वत: छगन भुजबळ हे रस्त्यावर उतरले नसले, तरी त्यांच्याच नेतृत्त्वात हे आंदोलन होत आहे. नाशिकमधील द्वारका चौकात सध्या दिलीप खैरे यांच्या नेतृत्वात ओबीसी आक्रोश आंदोलनाला सुरुवात झाली. द्वारका चौक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (gopichand padalkar told the state government against reservation)
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 17 June 2021https://t.co/01P77NuPay
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 17, 2021
संबंधित बातम्या:
OBC Morcha : नाशिकमध्ये ओबीसी आक्रोश मोर्चा, आरक्षण वाचवण्यासाठी समाज रस्त्यावर
भाजपला धक्का, माजी मंत्री सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये घरवापसी होणार!
VIDEO: शिवसेना-राष्ट्रवादी महाराष्ट्रात एकत्र आली तर चमत्कार होईल; संजय राऊतांचा पुनरुच्चार
(gopichand padalkar told the state government against reservation)