AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बियरचा खप वाढण्यासाठी सरकार समिती नेमतंय पण…सुषमा अंधारे यांनी केली बोचरी टीका

बिअरवरील उत्पादन शुल्काची दरवाढ केल्यानंतर बिअरच्या विक्रीत घट झाली आहे. त्यासंदर्भात तातडीने दखल घेणाऱ्या राज्य सरकारवर शिवसेना नेता सुषमा अंधारे यांनी खरमरीत टीका केली आहे.

बियरचा खप वाढण्यासाठी सरकार समिती नेमतंय पण...सुषमा अंधारे यांनी केली बोचरी टीका
sushma andhareImage Credit source: tv9 marathi
Updated on: Oct 22, 2023 | 11:00 PM
Share

मुंबई | 22 ऑक्टोबर 2023 : बिअरवरील उत्पादन शुल्क वाढविल्याने बिअरच्या विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणात आयएएस अधिकाऱ्यांची पाच सदस्यीय समिती नेमली आहे. या संदर्भातील राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकाचा दाखला देत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारला बियरचा खप घसल्याने समिती नेमायला वेळ आहे. परंतू महिलांवरील गुन्हे कमी होतील किंवा बेरोजगारी कशी कमी करता येईल यावर समिती नेमायला वेळ नाही अशी टीका अंधारे यांनी सोशल मिडीयावर केली आहे.

बिअरवरील उत्पादन शुल्काची दरवाढ केल्यानंतर बिअरच्या विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे बिअरच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहक तिच्या आकृष्ट होत नसल्याने बियरची विक्री घसरली आहे. त्यामुळे बियर उद्योगा समोरील अडचणी दूर करण्यासाठी शासनाने पाच सदस्यीय समिती नेमली आहे. याबाबतचा जीआर शिवसेना उपनेता सुषमा अंधारे यांनी सोशल मिडीयावर शेअर केला आहे. फेसबुकवर त्यांनी एक खरमरीत पोस्ट लिहीली आहे. त्यात त्या म्हणतात, महाराष्ट्रात गुन्हेगारीचा वाढता दर कमी करण्यासाठी कुठलीही अभ्यास समिती नाही. महिला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी समिती नाही. तरुणामध्ये प्रचंड बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे, ते कमी करण्यासाठी समिती नाही. परंतू सरकार बियरचे आकर्षण वाढण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. विशेष या पाच जणांमध्ये एक बियर असोसिएशनचा सदस्यही घेण्यात आल्याची टीका त्यांनी केली आहे.

BEER SAMITI

काय आहे समिती

राज्यात बियरवरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे बियरची किंमत वाढून तिच्या विक्रीचा आलेख व परिणामी मिळणारा शासन महसूल कमी झाला आहे. तसेच विदेशी किंवा देशी मद्य प्रकारामध्ये मद्यार्काचे प्रमाण बिअरच्या पेक्षा जास्त असते. मद्यार्काच्या प्रमाणाच्या आधारे तुलना केली असता बिअरवरील उत्पादन शुल्काचा दर इतर मद्यापेक्षा जास्त असल्याने बिअरच्या जादा किंमतीमुळे ग्राहक बिअर पिण्याकडे आकृष्ट होत नाहीत, अशा बिअर उद्योगापुढील अडचणी बिअर उद्योगाच्या प्रतिनिधीने सरकारला सादर केल्या आहेत. त्यावर सरकारने आयएएस अधिकाऱ्यांची पाच सदस्यीय समिती नेमली आहे. इतर राज्यांनी उत्पादन शुल्क कमी केल्याने बियरचा खप त्या राज्यात वाढल्याचे या परिपत्रकात नमूद केले आहे.

माझे हात-पाय तोडताना कराडला LIVE पाहायच होतं, पवारांच्या नेत्याचा दावा
माझे हात-पाय तोडताना कराडला LIVE पाहायच होतं, पवारांच्या नेत्याचा दावा.
आरोपांचा डान्सबार अन् महायुतीतच रंगले वार-प्रतिवार?
आरोपांचा डान्सबार अन् महायुतीतच रंगले वार-प्रतिवार?.
5 मंत्र्यांना बडतर्फ करा, ठाकरेंच्या नेत्यांची राज्यपालांकडे लिस्ट अन्
5 मंत्र्यांना बडतर्फ करा, ठाकरेंच्या नेत्यांची राज्यपालांकडे लिस्ट अन्.
अहवाल बदलला जाणार नाही ना? एकनाथ खडसेंचा तपास यंत्रणेवर सवाल
अहवाल बदलला जाणार नाही ना? एकनाथ खडसेंचा तपास यंत्रणेवर सवाल.
45 खासदार गप्प बसले, पण..; राज ठाकरेंचं वर्षा गायकवाड यांना पत्र
45 खासदार गप्प बसले, पण..; राज ठाकरेंचं वर्षा गायकवाड यांना पत्र.
पहलगाम हल्ल्यातल्या 2 अतिरेक्यांना कंठस्नान
पहलगाम हल्ल्यातल्या 2 अतिरेक्यांना कंठस्नान.
ये पब्लिक है...सब जानती है...पलटी मारली म्हणत फडणवीसांचा ठाकरेंना टोला
ये पब्लिक है...सब जानती है...पलटी मारली म्हणत फडणवीसांचा ठाकरेंना टोला.
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे 20 मिनिटं; भावांमध्ये काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे 20 मिनिटं; भावांमध्ये काय झाली चर्चा?.
सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी; रोहित पवारांचे नवे आरोप
सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी; रोहित पवारांचे नवे आरोप.
बोट दुर्घटना प्रकरण; 3 बेपत्ता मच्छीमारांचे मृतदेह सापडले
बोट दुर्घटना प्रकरण; 3 बेपत्ता मच्छीमारांचे मृतदेह सापडले.