भुजबळही सर्वपक्षीय होवो, राज्यपालांची भुजबळांना भाजपमध्ये येण्याची ऑफर?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिक दौऱ्यावर येऊन मोठं विधान केलं आहे. (governor bhagat singh koshyari offer to chhagan bhujbal to join bjp)

भुजबळही सर्वपक्षीय होवो, राज्यपालांची भुजबळांना भाजपमध्ये येण्याची ऑफर?
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 1:32 PM

नाशिक: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिक दौऱ्यावर येऊन मोठं विधान केलं आहे. कोश्यारी यांनी भाषणाच्या ओघात थेट राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. थेट राज्यपालांनीच भुजबळांना अप्रत्यक्षपणे ही ऑफर दिल्याने त्याचे अनेक राजकीय अर्थ निघत आहेत. (governor bhagat singh koshyari offer to chhagan bhujbal to join bjp)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज नाशिकमध्ये आले होते. सटाणा येथे संत शिरोमणी देवमामलेदार स्मारकाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी छगन भुजबळांना भाजपमध्ये येण्याची अप्रत्यक्ष ऑफर देवून खळबळ उडवून दिली. माझ्यासाठी सगळेच देवमामलेदार आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांना मी प्रथम प्रणाम करतो. भुजबळांनी संपूर्ण बळ लावलं म्हणून हे स्मारक होत आहे. त्यामुळे भुजबळही सर्वपक्षीय होवोत अशी देवमामलेदारांना प्रार्थना करा म्हणजे सर्व भांडण संपून जाईल आणि तुम्हाला भरघोस निधी मिळेल, असं सांगत राज्यपालांनी थेट भुजबळांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

तर लक्ष्य साध्य झालं नसतं

प्रभू रामचंद्रासोबत वानर नसते आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मावळे नसते तर लक्ष्य साध्य झालं नसतं. त्यामुळे आपण देखील एकत्र मिळून काम करावं, असं सांगतानाच नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी थोडा प्रयत्न केला तर भुजबळांचे बॉस असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा देखील आशीर्वाद त्यांना मिळेल, असा चिमटाही त्यांनी काढला. (governor bhagat singh koshyari offer to chhagan bhujbal to join bjp)

governor bhagat singh koshyari

डर जाओगे तो मर जाओगे

यावेळी राज्यपालांनी ते मुख्यमंत्री असतानाचे किस्से ऐकवतानाच त्यांच्या कार्यपद्धतीची माहितीही दिली. मी मुख्यमंत्री असताना अधिकाऱ्यांना मोकळ्या हाताने काम करायला सांगायचो. डर जाओगे तो मर जाओगे, असं मी अधिकाऱ्यांना सांगायचो, असं कोश्यारी म्हणाले. मसुरी येथे होणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात सर्वांना यशवंतराव महाराजांचं पुस्तक वाचायला देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, खासदार डॉ.सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, विशेष पोलिस महानिरिक्षक प्रताप दिघावकर, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नगराध्यक्ष सुनील मोरे आदी उपस्थित होते. (governor bhagat singh koshyari offer to chhagan bhujbal to join bjp)

संबंधित बातम्या:

माझं कार्यालय सर्वांचं दुःख दूर करणार, वीरमातेच्या हस्ते बच्चू कडूंच्या मंत्रालय दालनाचे उद्घाटन

‘जिलेबी-फाफडा डिप्लोमसी’ सक्सेस, आता ‘रासगरबा’; 21 गुजराती उद्योगपतींचा रविवारी शिवसेनेत प्रवेश!

BMC Budget 2021 updates live : शिक्षण विभागासाठी 2945 कोटी, महापालिकेच्या सर्व शाळांचं नाव बदलणार

(governor bhagat singh koshyari offer to chhagan bhujbal to join bjp)

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.