सरकार नेमकं काय करतंय?; राज्यपालांचा ठाकरे सरकारला सवाल

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जाहीर कार्यक्रमातून भाजपमध्ये येण्याचं आवतन दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी थेट राज्य सरकारवर टीका केली आहे. (governor bhagat singh koshyari taunt maharashtra government in nashik program)

सरकार नेमकं काय करतंय?; राज्यपालांचा ठाकरे सरकारला सवाल
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 7:06 PM

नाशिक: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जाहीर कार्यक्रमातून भाजपमध्ये येण्याचं आवतन दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी थेट राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकारचे मंत्रीही माझ्याकडे मागण्या करतात. मग सरकार नेमकं काय करतं? असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. (governor bhagat singh koshyari taunt maharashtra government in nashik program)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सुरगणा येथे आदिवासी लाभार्थ्यांना वनकट्ट्यांचं वाटप करण्यात आलं. गुलाबी गाव भिंतघर येथे हा कार्यक्रम झाला. एकूण 11137 लाभार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते सातबारा प्रदान करण्यात आले. त्यावेळी राज्यपालांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. याप्रसंगी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळही उपस्थित होते. यावेळी झिरवळ यांनी राज्यपालांकडे या भागाची समस्या मांडली. या भागात भरपूर पाऊस पडतो. पण सर्व पाणी समुद्राला वाहून जातं. पाणी अडवण्यासाठी तुम्ही मदत करा. हा भाग समृद्ध होईल, असं झिरवळ म्हणाले. झिरवळ यांच्या मागणीचा हाच धागा पकडून राज्यपालांनी राज्य सरकारला टोले लगावले. झिरवळ सरकारमध्ये आहेत. पण ते माझ्याकडे मागणी करतात. मग राज्य सरकार काय करतंय? धावपटू कविता राऊतला नोकरी देण्यात आली नाही. क्रीडामंत्री केवळ नोकरी देण्याची भाषा करत आहेत. काहीच करत नाही. मग सरकार नेमकं काय करतंय, असा सवाल राज्यपालांनी केला.

आदिवासींनी मुख्य प्रवाहात यावं

शहरं झपाट्याने वाढली. त्यांचा विकासही झाला. मात्र आदिवासी कायम दुर्लक्षित राहिला आहे. गरजा कमी पडल्या तरी अडचणी असतात. तरीही आदिवासी कायम आनंदी राहिला आहे. घरासाठी आदिवासी सरपण तोडत असतील तर वनाधिकाऱ्यांनी त्यांना खुशाल सरपण तोडू द्यावं, अशा सूचना करतानाच आदिवासी समाजाने मुख्य प्रवाहात यायला हवं, असं आवाहनही त्यांनी केलं. (governor bhagat singh koshyari taunt maharashtra government in nashik program)

भुजबळ सर्व पक्षीय होवो

दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सटाणा येथे संत शिरोमणी देवमामलेदार स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी छगन भुजबळांना भाजपमध्ये येण्याची अप्रत्यक्ष ऑफर देवून खळबळ उडवून दिली. माझ्यासाठी सगळेच देवमामलेदार आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांना मी प्रथम प्रणाम करतो. भुजबळांनी संपूर्ण बळ लावलं म्हणून हे स्मारक होत आहे. त्यामुळे भुजबळही सर्वपक्षीय होवोत अशी देवमामलेदारांना प्रार्थना करा म्हणजे सर्व भांडण संपून जाईल आणि तुम्हाला भरघोस निधी मिळेल, असं सांगत राज्यपालांनी थेट भुजबळांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. प्रभू रामचंद्रासोबत वानर नसते आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मावळे नसते तर लक्ष्य साध्य झालं नसतं. त्यामुळे आपण देखील एकत्र मिळून काम करावं, असं सांगतानाच नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी थोडा प्रयत्न केला तर भुजबळांचे बॉस असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा देखील आशीर्वाद त्यांना मिळेल, असा चिमटाही त्यांनी काढला होता. (governor bhagat singh koshyari taunt maharashtra government in nashik program)

संबंधित बातम्या:

भुजबळही सर्वपक्षीय होवो, राज्यपालांची भुजबळांना भाजपमध्ये येण्याची ऑफर?

कोरोना लसीचा काहीच भरोसा नाही? लस घेतली तरी कोरोना झाला! नेमकं काय काय झालं?

VIDEO : भलतंच धाडस! त्यानं चक्क बिबट्याच्या बछड्याला पकडून घेतला सेल्फी, व्हिडीओ व्हायरल

(governor bhagat singh koshyari taunt maharashtra government in nashik program)

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.