Gram Panchayat Election 2023 Voting Live | ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 74 टक्के मतदान झाले आहे.

| Updated on: Nov 06, 2023 | 7:04 AM

Maharashtra Gram Panchayat Election 2023 Voting Live : आज रविवार दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. तसेच राज्यातील महत्त्वाच्या आणि वेगवान राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा घडामोडी जाणून घ्या.

Gram Panchayat Election 2023 Voting Live | ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 74 टक्के मतदान झाले आहे.
grampanchayat election

मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 : राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९  ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. सोमवारी निकाल येणार आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण जनता कोणाच्या सोबत आहे, हे स्पष्ट होणार आहे. सत्तेत एकत्र असलेले अजित पवार आणि भाजप यांच्यात पुणे जिल्ह्यातील काटेवाडीत सामना रंगणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा आज कोलकोता येथे दक्षिण आफ्रिकेशी सामना होणार आहे. भारतीय संघ यापूर्वीच उपांत्यफेरीत पोहचला आहे. रत्नागिरी शहरात सकाळी पावसाचे आगमन झाले आहे. राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Nov 2023 09:18 PM (IST)

    शिंदे पळसे एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग

    नाशिक : शिंदे पळसे एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग लागली आहे. रंग तयार करणाऱ्या कंपनीला आग लागल्याची माहिती मिळतेय. ही आग शेजारील कंपनीत देखील पसरली. त्यामुळे दोन्ही कंपन्यांमध्ये आगीचे लोळ पसरले. दोन्ही कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल साठा असल्याची माहिती आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी आहेत.

  • 05 Nov 2023 08:02 PM (IST)

    प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी पूर्वेतील दुसऱ्या कार्यालयाचे उद्घाटन

    मुंबई : मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ मरोशी रोड परिसरात उद्घाटन करण्यात आले. येणाऱ्या 2024 विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत.

  • 05 Nov 2023 07:04 PM (IST)

    नागपूरमध्ये भीषण आग, दोन दुकाने जळाली

    नागपूर : सीताबर्डी परिसरात अजय गारमेंट आणि पदम जनरल स्टोअर्सला मोठी आग लागली. दिवाळी आणि सणासुदीचा काळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी होती. यावेळी दुकानाच्या एका कोपऱ्यात आग लागली असताना लक्षात येताच आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, दुकानातील साहित्याने लगेच पेट घेतला आणि दुकान आगेच्या कवेत सापडले. दीपक चौरसिया यांच्या मालकीचे हे दुकान असून चार मजली इमारतीचे आणि साहित्याचे पूर्ण नुकसान झाले.

  • 05 Nov 2023 06:15 PM (IST)

    अहमदनगरमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, 75 ते 78 टक्के मतदान झाल्याचा अंदाज

    अहमदनगर : जिल्ह्यात 178 ग्रामपंचायतसाठी मतदान पार पडलं. सर्वच 732 मतदान केंद्रावर शांततेत आणि सुरळीत पद्धतीने मतदान झाले. 1701 सदस्य पदासाठीच्या 3995 उमेदवारांचे आणि सरपंच पदाच्या 610 उमेदवारांचेही भवितव्य मतपेटीत कैद झाले आहे. जिल्ह्यातील मंत्री राधाकृष्ण विखे, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आमदार राम शिंदे, रोहित पवार, निलेश लंके, मोनिका राजळे यांच्यासारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. साडेपाच वाजेपर्यंत साधारणतः 75 ते 78 टक्के मतदान झाले असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे

  • 05 Nov 2023 05:46 PM (IST)

    गडचिरोलीमध्ये मतदान शांततेत पार पाडले, सात तारखेला निकाल लागणार

    गडचिरोली : जिल्ह्यातील सात तालुक्यात 80 बेस कॅम्प तयार करून मतदान शांततेत पार पाडले नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रावरून मतदान संपल्यानंतर ईव्हीएम पेट्या घेऊन पोलिंग पार्ट्या मोठ्या पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील 109 ग्रामपंचायतीवर येणारा कौल सात तारखेला कोणत्या पक्षाची सत्ता कोणत्या ग्रामपंचायतवर येणार हे ठरवेल.

  • 05 Nov 2023 05:20 PM (IST)

    जाळपोळ घटनेचा मास्टर माईंड शोधा – आमदार सुरेश धस

    बीड : जाळपोळ घटनेनंतर आमदार सुरेश धस बीडमध्ये दाखल झाले. भाजप कार्यालयाची त्यांनी पाहणी केली. अशी घटना मी कधीही पहिली नाही. हिंसा घडविणारे आंदोलक नाहीत. त्यांच्याकडे दगड, बॅगमध्ये पेट्रोल बॉम्ब होते. प्रत्येक राजकीय पुढारी यांना त्यांनी लक्ष केलं होते. पोलिसांनी दीडशेहून जास्त आरोपींना अटक केली आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आमदार प्रकाश सोळंके यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या नंतर घर जाळण्याचा प्रकार झाला. याचा मास्टर माईंड शोधला पाहिजे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली.

  • 05 Nov 2023 04:59 PM (IST)

    शंभर मीटरच्या आत उभे राहू नये या कारणावरून शाब्दिक वाद

    वर्धा : वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील काकडधरा येथे दोन गटातील व्यक्तिमध्ये शाब्दिक वाद झाला. मतदान केंद्रावर शंभर मीटरच्या आत उभे राहू नये या कारणावरून हा शाब्दिक वाद झाल्याचे सांगण्यात येतय. वाद करणाऱ्यांना पोलिसांच्या मध्यस्तीने बाजूला केल्यानंतर हा वाद मिटला. मतदान केंद्रापासून दूर अंतरावर वाद झाल्याचे सांगण्यात येतय.

  • 05 Nov 2023 04:46 PM (IST)

    एकत्र राहिलेले दोन महिन्यात एकमेकांचे राजीनामा मागायला लागलेत – केंद्रीय मंत्री कपिल पाटील

    कल्याण : सुनील तटकरे यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. तर तटकरेंकडूनही सुळे यांची लोकसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली आहे. याबाबत भाजपाचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी ते कशासाठी राजीनामा मागतायत हे मला माहित नाही. मात्र, एकत्र राहिलेले दोन महिन्यात एकमेकांचे राजीनामा मागायला लागलेत असा टोला लगावला. त्यांचं काय चाललंय हे त्यांनाच माहित मला माहित नाही असेही ते म्हणाले.

  • 05 Nov 2023 04:33 PM (IST)

    ब्रेकिंग : अमरावतीत महिला पोलीस अधिकाऱ्याला ट्रकने चिरडले

    अमरावती : अमरावतीच्या बियाणी चौकात रेतीचा ट्रक आणि दुचाकी यांच्यामध्ये अपघात झाला. या अपघातात सहाय्यक पोलीस अधिकारी प्रियंका कोठेवार यांचा पाय निकामी झाला. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिला पोलीस अधिकारी प्रिंयका कोटावार ह्या आपल्या कर्तव्यावर राजापेठ पोलीस ठाण्यात जात होत्या. त्यावेळी हा अपघात झाला.

  • 05 Nov 2023 04:28 PM (IST)

    मंत्री दादा भुसे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यात रंगल्या गप्पा

    नाशिक : राजकारणात एकमेकांवर चिखलफेक करणारे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि शिवसेना ( उबाठा) नेते बबनराव घोलप हे आज दिलखुलास गप्पा मारतांना दिसून आले. नाशिकच्या मालेगाव येथे महापालिकेचे गटनेते एजाज बेग यांनी आयोजित केलेल्या मुस्लिम बांधवांच्या २५ सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त हे नेते एकत्र आले होते.

  • 05 Nov 2023 03:54 PM (IST)

    राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका

    राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आलाय. आता त्यांना उपचारासाठी थेट तातडीने मुंबईला हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

  • 05 Nov 2023 03:44 PM (IST)

    कृपया भावना भडकवणयाचा प्रयत्न करू नये- धनंजय मुंडे

    हात जोडून विनंती आहे, मराठा आरक्षणासाठी मी 1998 पासून काम करत आहे. कृपया भावना भडकवणयाचा प्रयत्न करू नये, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

  • 05 Nov 2023 03:40 PM (IST)

    बाळासाहेब थोरात यांचे मोठे विधान

    पुढच्या काळात मुख्यमंत्री बनण्याची संख्या तशी मोठी आहे. प्रत्येक राजकीय व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती वर जावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, अशी इच्छा व्यक्त करण गैर नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

  • 05 Nov 2023 03:22 PM (IST)

    धनंजय मुंडे यांनी केला अत्यंत मोठा खुलासा

    राष्ट्रवादी भवन जाळले, क्षीरसागर यांचे घर आणि ऑफिस जाळले. सुभाष राऊत यांचे आखे  हॉटेल जाळले, भाजप शिवसेनाचे कार्यालय फोडले. हे ठरवून केले गेले. कडक कारवाई झाली पाहिजे, बीड जिल्ह्याची मागणी आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

  • 05 Nov 2023 03:13 PM (IST)

    नागपूरच्या सीताबर्डी मार्केट परिसरातील दुकानाला आग

    नागपूरच्या सीताबर्डी मार्केट परिसरातील दुकाना आग लागलीये. मोदी नंबर दोन मधील दुकानाला लागली आग आहे. दिवाळीजवळ असल्याने मार्केटमध्ये गर्दी आहे.

  • 05 Nov 2023 03:11 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात चार ग्रामपंचायतची निवडणूक मतदान सुरू

    गोंदिया जिल्ह्यात चार ग्रामपंचायतची निवडणूक मतदान सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 67.71 मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे रणधुमाळी सुरू असून जिल्ह्यात चार ठिकाणी ग्रामपंचायतीचे सर्वत्रिक निवडणूक होत आहे तर 7 ठिकाणी पोटनिवडणूक सुरू असून सध्या दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात 67.71 एवढी मतदानाची नोंद करण्यात आली आहे

  • 05 Nov 2023 03:01 PM (IST)

    Gondia Gram Panchayat Election 2023 Voting |  जिल्ह्यात चार ग्रामपंचायतींसाठी आतापर्यंत 67.71 टक्के मतदान

    गोंदिया | जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यात 4 ठिकाणी ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणूक होत आहे. तर 7 ठिकाणी पोटनिवडणूक सुरू आहे. दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात 67.71 एवढी मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

  • 05 Nov 2023 02:51 PM (IST)

    Washim Gram Panchayat Election 2023 Voting | एका बाजूला मतदान, दुसऱ्या बाजूला दारु विक्री

    वाशीम | वाशिमच्या कामरगावात मतदान सुरू असताना खुलेआम दारू विक्री होत असल्याचा प्रकार धक्कादायक समोर आला आहे. थेट मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसराच्या आता दारूविक्री. अवैध दारू विक्रीचा थेट व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडालीय. पोलीस चौकीपासून अवघ्या 30 मीटर अंतरावर आणि ड्राय डे असतानाही दारु विक्री होतेय. त्यामुळे स्थानिक धनज पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

  • 05 Nov 2023 02:22 PM (IST)

    Baramati Gram Panchayat Election 2023 Voting | काटेवाडीतील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, आत्तापर्यंत 60 टक्के मतदान

    बारामती | राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. बारामतीतील काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. काटेवाडी ग्रामपंचायत साठी दुपारी दीड वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झालंय. नागरिकांनी सकाळपासून मतदानासाठी केंद्रावर एकच गर्दी केलीय. काटेवाडीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी समोर भाजपचं पॅनल आहे.

  • 05 Nov 2023 02:16 PM (IST)

    Thane Gram Panchayat Election 2023 Voting | ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आतापर्यंत 31.16 टक्के मतदान

    ठाणे | राज्यात विविध ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. मुंबई शेजारील ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 31.16 टक्के मतदान झालं आहे. ठाण्यातील कोणत्या भागाता किती टक्के मतदान झालंय हे टक्केवारीच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

    भिवंडी – 28.74%

    शहापूर – 29.74%

    मुरबाड – 42. 72%

    एकूण 31.16% मतदान.

    तर 60 ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी भिवंडीत 28.26%, शहापुरात36.45%, मुरबाडमध्ये 31. 74% आणि अंबरनाथमध्ये 44.38 टक्के मतदार झालंय. तर 60 ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 35.97% मतदान झालंय.

  • 05 Nov 2023 01:34 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात दु. 1 वाजेपर्यंत 33 टक्के मतदान

    सांगली जिल्ह्यातील 83 ग्रामपंचायती आणि 81 सरपंच पदासाठी मोठ्या चुरशीने मतदान सुरू आहे,दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यात 33 टक्के मतदानाची नोंद झाली असून शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

  • 05 Nov 2023 01:07 PM (IST)

    रायगड ग्रा.पं.निवडणूक स.11 पर्यंत 19.58 टक्के मतदान

    ग्रामपंचायत निवडणूकीत आतापर्यंत स. साडे नऊ ते साडे अकरा पर्यंत 19.58 टक्के मतदान झालं आहे. परभणी जिल्ह्यातील 3 सार्वत्रिक ग्रामपंचायत आणि 8 पोटनिवडणुकीसाठी सकाळी 7:30 ते 11:30 पर्यंत 37.81 टक्के इतका मतदान झाले आह.

  • 05 Nov 2023 12:57 PM (IST)

    बनावट लोक राजकीय स्वार्थ साधायचा म्हणून संघ नावाने सुरुवात- बाळासाहेब लांडगे पाटील

    बनावट लोक राजकीय स्वार्थ साधायचा म्हणून संघ नावाने सुरुवात केली. स्थानिक गुन्हेगारांना धरून त्यांचे काम सुरु आहे. दुसरी संघटना अनधिकृत असून कुस्ती क्षेत्राची हानी होतेय.

  • 05 Nov 2023 12:45 PM (IST)

    मराठवाड्यातील लोकांना पाण्यासाठी भीक मागावी लागते- संजय शिरसाट

    कोकणातून येणार पाणी आम्हाला मिळणारच नाही, पाण्यासाठी आम्हाला आंदोलन उभं करावं लागेल, असं संजय शिरसाट म्हणाले.

  • 05 Nov 2023 12:34 PM (IST)

    राजकीय पुढारी मतदानासाठी बुथवर

    गुलाबराव पाटील, आदिती तटकरे आणि हर्षवर्धन पाटलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

  • 05 Nov 2023 12:19 PM (IST)

    राज्य सरकारने आरक्षण प्रश्न मांडला की नाही हाच प्रश्न- अंबादास दानवे

    आरक्षण देण्याबाबत सरकार योग्य दिशेने काम करत आहे असे म्हणन्यास हरकत नाही परंतु राज्य सरकार अजून केंद्र सरकारशी बोलतच नाही, आणि केंद्र सरकार दरबारी राज्य सरकारने आरक्षण प्रश्न मांडला की नाही हाच प्रश्न असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

  • 05 Nov 2023 11:59 AM (IST)

    ग्रामपंचायत निवडणूक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची – आदिती तटकरे

    रायगड : ग्रामपंचायतची निवडणूक खरंतर विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. मतदानाच्या टक्का सुद्धा इतर निवडणुकीच्या तुलनेत ग्रामपंचायतला अधिक असतो.  ग्रामपंचायतीची जरी निवडणूक असली तरी शांतता आणि एकोपा टिकून राहणं हे अतिशय गरजेचं असतं, असे मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलंय.

  • 05 Nov 2023 11:55 AM (IST)

    योग्य उमेदवाराला निवडून द्या, अनिकेत तटकरेंचं आवाहन

    रायगड : देशाच्या व्यवस्थेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे ग्रामपंचायत गावा गावामध्ये खेड्यापाड्यांमध्ये थेट पणाने शासकीय योजना पोहोचवण्याचे संधी असते त्यातूनच खरं देश उभारत असतो देशाचे नागरिक म्हणून संधी असते ती बजवण्याकरता आलोय. देशाच्या व्यवस्थेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे ग्रामपंचायत गावा गावामध्ये खेड्यापाड्यांमध्ये थेट पणाने शासकीय योजना पोहोचवण्याचे संधी असते त्यातूनच खरं देश उभारत असतो देशाचे नागरिक म्हणून संधी असते ती बजवण्याकरता आलोय , असे अनिकेत तटकरे यांनी म्हटलंय.

  • 05 Nov 2023 11:49 AM (IST)

    ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढणार?

    ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत 13.28% मतदान झाले. सकाळी मतदारांची टक्केवारी कमी असली तरी दुपारनंतर ही वाढण्याची शक्यता आहे तर 61 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तर 60 ग्रामपंचायत रिक्त असलेल्या सदस्य आणि सरपंच पदाच्या निवडणुका होणार असून आज सकाळपासूनच ठाणे जिल्ह्यात 13.28% मतदान झाले आहे.

  • 05 Nov 2023 11:40 AM (IST)

    कारला गावातील मतदान केंद्रावर राडा

    अमरावती : कारला गावातील मतदान केंद्रावर राडा झाल्याचे पाहायला मिळाले. हा राडा दोन गटांमध्ये झाला असून पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्र परिसरातून बाहेर काढले आहे.

  • 05 Nov 2023 11:35 AM (IST)

    रायगडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत किती झालं मतदान?

    रायगड : ग्रामपंचायत निवडणूक आतापर्यंत साडेसात ते साडेनऊ पर्यंत 13.26 टक्के मतदान झालं आहे

  • 05 Nov 2023 11:31 AM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलने आणि अभियानास मनाई

    पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सभासद नोंदणी, विविध अभियान, कार्यक्रम, उपक्रम, आंदोलन आदींसाठी परवानगी मिळणार नसल्याचे जाहीर केले. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता, विद्यापीठाच्या प्रशासनाने निर्णय घेतलाय. पूर्वपरवानगीशिवाय अशा पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्यांवर कायदेशीररीत्या कारवाई करण्यात येणार आहे.

  • 05 Nov 2023 11:26 AM (IST)

    ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची टक्केवारी

    61 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये

    • भिवंडीत 12.51%
    • शहापूर मध्ये 12.62%
    • मुरबाड मध्ये 17. 52%

    एकूण 13.28% मतदान झाले

    तर 60 ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी

    • भिवंडीत 12.40%
    • शहापूर मध्ये 16.34%
    • मुरबाड मध्ये 11. 54%
    • अंबरनाथ मध्ये 18.90

    एकूण 15.94% मतदान झाले

  • 05 Nov 2023 11:21 AM (IST)

    आम्ही न्याय आणि दाद कुणाला मागायची, सुप्रिया सुळेंचा सवाल

    बारामतीच्या काटेवाटीत पैशांचं वाटप करण्यात आल्याच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळेंचं भाष्य,  याचं उत्तर गृहमंत्री यांनी दिले पाहिजे. अजित पवार गट पैसे वाटत असेल तर ते त्यांनी गृहमंत्र्यांनी पाहावं… गृहमंत्री राज्यात आहे की प्रचाराला दुसऱ्या राज्यात गेले हे पणं कळत नाही.आम्ही न्याय आणि दाद कुणाला मागायची, सुप्रिया सुळेंची टीका

  • 05 Nov 2023 11:15 AM (IST)

    महायुती सरकारच्या स्थापनेनंतर ही पहिलीच निवडणूक

    पुणे : पुरंदर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होतंय. आज सकाळ पासूनच तालुक्यातील विविध गावातून मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांनी केंद्रावर मोठी गर्दी केलीय. तालुक्यात १५ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात येते आहे. यापैकी तीन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झालीय. तर १२ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान घेण्यात येतेय. तर उद्या मतमोजणी केली जाणार आहे . महायुती सरकारच्या स्थापनेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीची ही पहिलीच निवडणूक आहे.त्यामुळे सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोर लावलाय..

  • 05 Nov 2023 11:09 AM (IST)

    इगतपुरी तालुक्यात मतदान केंद्राबाहेर चोख पोलीस बंदोबस्त

    नाशिक : इगतपुरी तालुक्यात सोळा ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. आज सकाळ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र बराच वेळ उलटूनही मतदान केंद्रावर हवी तशी गर्दी दिसत नसून शेतीची कामे सुरू असल्याने अनेक मतदार दुपार नंतर मतदान करणार असल्याचे समजते. इगतपुरी तालुक्यातील दौंड येथे 80 वर्षे वृद्ध महिला आणि एक अपंग महिलने आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून मतदान केंद्राबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

  • 05 Nov 2023 10:55 AM (IST)

    Live Update : मांडळ गावात मतदान केंद्राच्या बाहेर दोन गटात बाचाबाची

    मांडळ गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान दरम्यान दोन गटात रडा झाला आहे. मतदान केंद्राच्या बाहेर दोन गटात बाचाबाची… मतदान काही काळ प्रक्रिया थांबवली.. आता मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे…

  • 05 Nov 2023 10:38 AM (IST)

    Live Update | बारामतीच्या काटेवाटीत पैशांचं वाटप, भाजप पॅनल प्रमुखाचा आरोप

    बारामतीच्या काटेवाटीत पैशांचं वाटप करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. असा आरोप भाजप पॅनल प्रमुखाने केला आहे. ४ हजार ग्रामस्थांना पैसे वाटल्याचा आरोप भाजप पॅनल प्रमुखाने केला आहे.

  • 05 Nov 2023 10:35 AM (IST)

    Live Update : नागपूरच्या प्रजापतीनगरमध्ये एका खासगी कंपनीच्या कार्यालयाला आग

    नागपूरच्या प्रजापतीनगरमध्ये एका खासगी कंपनीच्या कार्यालयाला आग लागली आहे. आगीत कार्यालयाची कागदपत्र आणि फर्निचर जळून खाक झालं आहे. आग नेमकी कशी लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट

  • 05 Nov 2023 10:25 AM (IST)

    Live Update : गोखले पुलाचं काम युद्धपातळीवर सुरु

    गोखले पुलाचं काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती मिळत आहे. एक मार्गिका फेब्रुवारीपर्यंत सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेल्वे परिसरात खांब टाकण्याच्या कामाला उशीर झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.

  • 05 Nov 2023 10:17 AM (IST)

    Live Update | माझी तब्येत ठणठणीत, काळजी करु नका – जरांगे पाटील

    माझी तब्येत आता ठणठणीत आहे. कोणाही काळजी करु नका.. असं जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सांगितलं आहे. १ डिसेंबरपासून प्रत्येत गावात साखळी उपोषण शांततेत सुरु करायचं आहे. कारण न्यायाचा दिवस समोर आला आहे. न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही… असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

  • 05 Nov 2023 10:04 AM (IST)

    Entertainment Update : ‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्रीचं निधन, टीव्ही विश्वावर शोककळा

    ‘साथ निभाना साथिया’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन झालं आहे. ज्यामुळे टीव्ही विश्वावर शोककळा पसरली आहे. ‘साथ निभाना साथिया’ मालिकेतील अभिनेत्री अपर्णा काणेकर यांचं निधन झालं आहे. वाचा सविस्तर

  • 05 Nov 2023 09:59 AM (IST)

    दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

    राज्यातील दिग्गज नेत्यांनी सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावली. ग्रामपंचायत निवडणुकीत दबदबा कायम राहावा आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नेते सकाळीच त्यांच्या गावात, मतदान केंद्रावर पोहचले आहे. सहपरिवार, कुटुंब, कार्यकर्त्यांसह त्यांनी मतदान केले. मंत्री, आजी-माजी आमदार, खासदारांनी मतदान केंद्रावर हजेरी लावली. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सर्वच जण आवाहन करत आहे.

  • 05 Nov 2023 09:40 AM (IST)

    अजित पवार मतदान करणार नाहीत

    काटेवाडी ग्रामपंचायत आम्हीच जिंकणार असा विश्वास अजित पवार यांच्या पत्नीने व्यक्त केला. तर अजित पवार यांच्यावर लोकांचे प्रेम आहे. आपल्या डोळ्यादेखत त्यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा त्यांच्या आईने व्यक्त केली. आजारपणामुळे अजित पवार ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करणार नाहीत. दुसरीकडे सांगोला तालुक्यातील चिकमहूद मतदान केंद्रावर शहाजीबापू पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. बावडा मतदान केंद्रावर हर्षवर्धन पाटील यांनी मतदान केले.

  • 05 Nov 2023 09:29 AM (IST)

    ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट

    ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट लागले आहे. मतदान आणि पॅनलच्या वादात राज्यातील काही गावांमध्ये राडा झाला आहे. नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीवरुन सरपंच पतीवर हल्ला करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या चिंचवड मतदान केंद्रावर दोन गट भिडले आहेत. काही गावातील मतदान केंद्रावर वाद झाल्याचे समोर येत आहे. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे काही ठिकाणी वाद निवळला आहे.

  • 05 Nov 2023 09:16 AM (IST)

    गावागावात धावपळ, मतदानासाठी लगबग

    राज्यातील अनके गावात सकाळपासूनच धावपळ सुरु आहे. पुढारी, नेते, कार्यकर्त्यांनी गाव न गाव पिंजून काढला आहे. प्रत्येक घरातील मतदारांची आकडेवारी, कोणी मतदान केले, कोण राहिलं याची खडानखडा अपडेट घेणे सुरु आहे. राज्यातील 2 हजार 500 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक होतेय. 130 रिक्त सरपंचपदासाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकांना महत्व आले आहे. विदर्भातील ६२८ ग्रामपंचायतीसाठीच्या मतदानाला सुरुवात होत आहे. मतदान सुरळीत होण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • 05 Nov 2023 09:00 AM (IST)

    अंधेरीच्या गोखले पुलाचं काम युद्ध पातळीवर सुरू

    मुंबईतील बहुचर्चित अंधेरी गोखले पुलाचा काम युद्ध पातळीवर सुरू आहे. गोखले पुलाचा काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 16 दिवसाचा मध्यरात्री तीन तासाच्या मेगाब्लॉक घेण्यात आला होता. याच मेगा ब्लॉक मध्ये मुंबई महानगरपालिकाने रेल्वे लाईनवर लोखंडी पिलर उभा केला. गेला आहे. लोखंडी पिलर उभा करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेध्ये मेगा ब्लॉक संदर्भात सवांद सुरू होतागोखले पुलच्या एका मार्गिकेचा काम नोव्हेंबर आणि डिसेंबर पर्यंत होणार होतं. रेल्वे परिसरातील लोखंडी पिलर टाकण्यात उशीर झाल्याने फेब्रुवारीपर्यंत एका मार्ग सामान्य वाहनांसाठी सुरू होणार अशी माहिती मिळतेय.

  • 05 Nov 2023 08:44 AM (IST)

    राजधानी दिल्लीत प्रदूषणाचा कहर

    राजधानी दिल्लीत आज पुन्हा प्रदूषणाचा कहर पाहायला मिळतोय. देशभरात आज दिल्ली मुंबई आणि कोलकाता जगातील 10 सर्वात प्रदूषित शहरांत आहे. राजधानी दिल्लीतल्या अनेक भागांमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स 476 वर आहे.  नवी दिल्लीमधील प्रदूषण गंभीर श्रेणीमध्ये आहे. कोलकत्ता शहरातील AQI 206 तर मुंबईतील AQI 162 आहे.  नवी दिल्लीत सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी दिली गेली आहे. गेल्या 48 तासांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय.

  • 05 Nov 2023 08:30 AM (IST)

    ग्रामपंचायत निवडणुकीआधी तुंबळ हाणामार

    इगतपुरी तालुक्यात 16 ग्रामपंचायत निवडणूक आज होत आहेत. या रणधुमाळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना काल रात्री उशिरा धारगाव ग्रामपंचायतच्या दोन महिला उमेदवार सदस्यांच्या पतींमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत घोटी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

  • 05 Nov 2023 08:15 AM (IST)

    नाशिकमध्ये ग्रामपंचायत उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला

    नाशिकमध्ये ग्रामपंचायत उमेदवाराच्या पतीवर रात्री जीवघेणा हल्ला झाला. इगतपुरी तालुक्यातील धारगाव पंचवार्षिक निवडणूक होत आहे. आज  मतदान प्रक्रिया पार पडत आहे.  रात्री 8 वाजेच्या सुमारास रंजन गोर्धने हे रस्तात उभे असताना अचानक टोळक्याने हल्ला केला.

  • 05 Nov 2023 08:09 AM (IST)

    Gram Panchayat Election | ग्रामपंचायत उमेदवारावर हल्ला

    इगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायतीत मतदान होत आहे. या ठिकाणी शनिवारी रात्री ग्रामपंचायत उमेदवाराचे पती रंजन गोर्धने यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. रात्री 8 वाजेता रंजन गोर्धने हे रस्तात उभे असताना अचानक टोळक्याने हल्ला केलाय.

  • 05 Nov 2023 07:59 AM (IST)

    Gram Panchayat Election | अजित पवार यांच्या काटेवाडीत मतदानासाठी गर्दी

    काटेवाडी ग्रामपंचायतीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या पॅनल समोर भाजपने आव्हान उभे केले आहे. सकाळपासून या ठिकाणी मतदानासाठी गर्दी झाली. अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनीही मतदान केले.

  • 05 Nov 2023 07:49 AM (IST)

    Rain | पाटण तालुक्यात अवकाळी पाऊस

    कराड आणि पाटण तालुक्यात सकाळपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. हा पाऊस रब्बी पिकांसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.

  • 05 Nov 2023 07:39 AM (IST)

    Gram Panchayat Election | अजित पवार मतदान करणार नाही

    अजित पवार यांचे काटेवाडी हे गाव आहे. या ठिकाणी अजित पवार आज मतदान करणार नाही. अजित पवार यांना डेंग्यू झाल्यामुळे ते मतदानास येणार नाही. त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार आणि त्यांच्या मातोश्री मतदानासाठी काटेवाडीत दाखल झाल्या आहेत.

  • 05 Nov 2023 07:32 AM (IST)

    Gram Panchayat Election | राज्यात मतदानास सुरुवात

    राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली. सकाळी, सकाळीच मतदानासाठी अनेक ठिकाणी रांगा लागल्या आहेत. लवकर मतदान करुन शेतात जाण्यासाठी ग्रामीण भागातील जनता मतदानासाठी सकाळीच गर्दी करत आहे.

Published On - Nov 05,2023 7:28 AM

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.