कुठे दोन गट भिडले, कुठे पैसे वाटपाचा आरोप, ग्रामपंचायत निवडणुकीत कुठे काय घडले?

Gram Panchayat Election 2023 Voting | राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु आहे. यावेळी काही ठिकाणी वाद झाले. काही जणांनी पैसे वाटप केल्याचा आरोप झाला. राज्यात अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान सुरु आहे. परंतु काही ठिकाणी निर्माण झालेल्या वादामुळे निवडणुकीला गालबोट लागले आहे.

कुठे दोन गट भिडले, कुठे पैसे वाटपाचा आरोप, ग्रामपंचायत निवडणुकीत कुठे काय घडले?
Follow us
| Updated on: Nov 05, 2023 | 12:54 PM

पुणे, कोल्हापूर, नाशिक | 5 नोव्हेंबर 2023 : राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. या निवडणुकीत काही ठिकाणी वाद निर्माण झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील चिंचवड मतदान केंद्रावर दोन गटाचे उमेदवार आणि मतदान प्रतिनिधी एकमेकांना भिडले. मतदान केंद्रातच दोन गटाचे प्रतिनिधी भिडले. सुरुवातीला पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने हा प्रकार चिघळला. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी हा प्रकार शूट करण्यास सुरुवात करताच पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्वांना बाहेर काढले. मतदारांना मतदान केंद्रात मतदान करायला सांगण्यावरून दोन्ही गटात वाद झाला. यावेळी शिवीगाळ करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ८९ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले.

धुळे जिल्ह्यात निर्माण झाला वाद

धुळे जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पाडत आहे. शिंदखेडा तालुक्यातील मांडळ येथे दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे मतदान प्रक्रियेवर परिणाम दिसून आला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटातील वाद मिटवला. या ठिकाणी एका चिठ्ठीवर उमेदवाराने निवडणूक चिन्ह नमूद केल्याचा आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर दोन गटांमध्ये राडा झाला.

अजित पवार यांच्या काटेवाडीत पैसे वाटल्याचा आरोप

अजित पवार यांच्या काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरु आहे. यावेळी भाजप पॅनल प्रमुख पांडुरंग कचरे यांनी पैसै वाटप केल्याचा आरोप केला आहे. काटेवाडीत अनेक लोकांना पैसे वाटप केल्याचा आरोप त्यांनी केला. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माजी सरपंच विद्याधर काटे यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यांनी पुरावे द्या, अशी मागणी केली. मग त्यांनीही पैसे वाटले, असा आरोप मी करु शकतो, असे काटे यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

अमरावती मतदान केंद्रावर वाद, इगतपुरीत हल्ला

अमरावती जिल्ह्यातील कारला गावातील मतदान केंद्रावर राडा झाला. हा राडा दोन गटांमध्ये झाला असून पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्र परिसरातून बाहेर काढले आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत ग्राम पंचायत उमेदवाराच्या पतीवर रात्री जीवघेणा हल्ला झाला. इगतपुरी तालुक्यातील धारगाव उमेदवाराचे पती रंजन गोर्धने हे रस्तात उभे असताना हा हल्ला झाला.

सोलापूरमध्ये रंगली ही चर्चा

सोलापूरच्या टेंभुर्णी गावात मतदारांनी लावलेल्या डिजीटलची सर्वत्र चर्चा रंगली आहे. टेंभुर्णी गावात ग्रामपंचायत निवडणुकीत नागरिकांनी आणि नरसिंह प्रतिष्ठानकडून जागृती करण्यात आली. पैसे वाटप किंवा अन्य आमिष दाखवून मतदान मागणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.