परळीकरांनी धनंजय मुंडेंना स्वीकारलं की नाही? 12 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर
परळी मतदारसंघातील परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील एकूण 12 ग्रामपंचायतींची या पहिल्या टप्प्यात निवडणूक होती.
बीड : बलात्काराच्या आरोपाने बॅकफूटवर गेलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे ग्रामपंचायत निवडणुकीतील वर्चस्व दिसून आलं आहे. परळी मतदारसंघात धनंजय मुंडे समर्थक पॅनेलने बाजी मारली आहे. परळी मतदारसंघातील परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील एकूण 12 ग्रामपंचायतींची या पहिल्या टप्प्यात निवडणूक होती. त्यापैकी 10 ग्रामपंचायतीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारल्याचा दावा त्यांनी केला आहे. उर्वरित 2 ठिकाणी संमिश्र निकाल आले आहेत. (Gram Panchayat Election Results 2021 Dhananjay Munde won here is the Results of 12 Gram Panchayats)
परळी तालुक्यातील रेवली आणि वंजारवाडी या दोन तर अंबाजोगाई तालुक्यातील मूर्ती, वाकडी व हनुमंतवाडी या 3 अशा एकूण 5 ग्रामपंचायती आधीच बिनविरोध निवड करण्यात धनंजय मुंडे यांना यश आलेले होते.
त्यानंतर झालेल्या उर्वरित गावांमधील निवडणुकीत परळी तालुक्यातील लाडझरी, मोहा, गडदेवाडी, सरफराजपुर या 4 गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली असून भोपळा ही एकमात्र ग्रामपंचायत भाजपला राखण्यात यश आले आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील एकूण 5 पैकी मूर्ती, वाकडी व हनुमंतवाडी या तीन ग्रामपंचायती बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या असून अंबलवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचेच दोनही पॅनल विजयी झाले आहेत. तर दत्तपूर 7 पैकी 2 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत.
दरम्यान 12 ग्रामपंचायत निवडणुकीत 10 ग्रामपंचतींमध्ये एकहाती विजय मिळवल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. या सर्व विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत धनंजय मुंडे यांच्या जगमित्र या संपर्क कार्यलयात विजयी जल्लोष केला. (Gram Panchayat Election Results 2021 Dhananjay Munde won here is the Results of 12 Gram Panchayats)
संबंधित बातम्या –
उस्मानाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: जिल्ह्यात महाविकास आघाडीची सरशी, कुठे कुणाची सरशी?
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : आ. अमोल मिटकरींच्या गावात कोण जिंकलं?, कोण हरलं?https://t.co/NxlNjYLahG@amolmitkari22 #GramPanchayatElectionResults
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 18, 2021
(Gram Panchayat Election Results 2021 Dhananjay Munde won here is the Results of 12 Gram Panchayats)