Gram Panchayat Elections | मतदान ओळखपत्र नसेल तर मतदान करता येतं का? वाचा संपूर्ण माहिती

कोरोना साथीला रोखण्यासाठी लागू केलेल्या नियमांचं पालन करत राज्यात निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे यासाठी कोणते आयडी महत्त्वाचे आहे? आणि मतदान ओळखपत्र नसेल तर मतदान करता येतं का?

Gram Panchayat Elections | मतदान ओळखपत्र नसेल तर मतदान करता येतं का? वाचा संपूर्ण माहिती
डिजीटल वोटर कार्ड
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:19 PM

मुंबई : कोरोना जीवेघण्या संसर्गानंतर आता राज्यात पहिल्यांदाच राज्यात पार पडणार आहेत. राज्यात आगामी काळात पालिका निवडणुका आणि ग्रामपंचायत निवडणुकांमुळे राजकीय वातावरणही तापलं आहे. अशात राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुका पार पडत आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज (15 जानेवारी) मतदान पार पडणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर, 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. (Gram Panchayat Elections Is it possible to vote without a voter ID card know here)

उद्याच्या निवडणुकांसाठी जेवढे नेते उत्सुक आहेत तेवढेच मतदारही उत्सुक आहे. कोरोना साथीला रोखण्यासाठी लागू केलेल्या नियमांचं पालन करत राज्यात निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे यासाठी कोणते आयडी महत्त्वाचे आहे? आणि मतदान ओळखपत्र नसेल तर मतदान करता येतं का? यासंबंधी लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. जाणून घेऊयात यासंबंधी महत्त्वाची माहिती….

मतदानाचा हक्क बजावताना तुमच्याकडे निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्र अर्थात व्होटर आयडी (voter id) आवश्यक आहे. मात्र ते जर (voter id) तुमच्याकडे नसेल तरीही तुम्हाला मतदान करता येईल, पण त्याऐवजी दुसरं अधिकृत ओळखपत्र आवश्यक असेल.

मतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य 11 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल.

मतदान ओळखपत्राऐवजी तुम्ही इतर सरकारी ओळखपत्र म्हणजे पासपोर्ट, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI कडून मिळालेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यक्रमपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असेलेल निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार, आमदार यांच्याकडून देण्यात आलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड ही कागदपत्र तुम्ही मतदान करता वेळेस घेऊन जाऊ शकतात.

मतदान केंद्रावर येण्यापूर्वी तुमचे नाव मतदान यादीत आहे का हे पाहावे लागेल. ज्यांचे नाव मतदार यादीत आहे अशाच मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश मिळेल. याबद्दल सरकारने काही सूचनाही दिल्या आहेत.

सूचना :

– फोटो ओळखपत्रावर तुम्ही मतदान करु शकत नाही. यासाठी तुमचे मतदान यादीत नाव असणे गरजेचे आहे.

– मतदान केंद्रावर मतदान पावती ओळखपत्रासोबत वरील दिलेल्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र असणे गरजेचे आहे.

मतदान ओळखपत्र नसेल तर पर्याय काय?

– पासपोर्ट

– वाहन चालक परवाना

– छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम

– सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र)

– छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक

– पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI कडून मिळालेले स्मार्ट कार्ड

– मनरेगा कार्यक्रमपत्रिका

– कामगार मंत्रालयाद्वारे देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

– छायाचित्र असेलेल निवृत्तीवेतन दस्तावेज

– खासदार, आमदार यांच्याकडून देण्यात आलेले ओळखपत्र

– आधारकार्ड (Gram Panchayat Elections Is it possible to vote without a voter ID card know here)

संबंधित बातम्या : 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता सेटिंग्ज सुरू

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

(Gram Panchayat Elections Is it possible to vote without a voter ID card know here)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.