परळीत होऊ घातलेल्या भव्य यात्री निवासची पहिली झलक पाहिलात का? धनंजय मुंडेकडून फोटो ट्विट
अजितदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून यात्री (भक्त) निवासाच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये यात्री निवासाचं संकल्पित छायाचित्रही दिलं आहे.
मुंबई : बारा जोर्तिलिंगापैकी एक असलेल्या परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात भव्य यात्री निवास उभारण्यात येणार आहे. तशी माहिती बीज जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरुन दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गुरुवारी (22 जुलै) वाढदिवस आहे. अजितदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून यात्री (भक्त) निवासाच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये यात्री निवासाचं संकल्पित छायाचित्रही दिलं आहे. (Grand Yatri Niwas will be set up at Vaidyanath Temple in Parli)
तीर्थक्षेत्र विकास योजनेतून आमच्या परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरातील भव्य यात्री ( भक्त ) निवासाच्या उभारणीच्या कामाचा उपमुख्यमंत्री मा. @AjitPawarSpeaks दादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्या गुरुवारी सायंकाळी शुभारंभ करत आहोत. (संकल्पित छायाचित्र) pic.twitter.com/w2WsRmU0NO
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 21, 2021
परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह अन्य विकासकामांचाही शुभारंभ अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या करण्यात येणार आहे. त्यात सर्किट हाऊस परिसरात 33 केव्ही उपकेंद्र उभारणी, शहरातील दोन सिमेंट रस्त्याच्या कामाचा समावेश आहे.
परळीच्या विकासाचे नवे पर्व. राज्याचे उपमुख्यमंत्री मा.@AjitPawarSpeaks दादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवास,सर्किट हाऊस परिसरात 33 केव्ही उपकेंद्र उभारणी व शहरातील दोन सिमेंट रस्त्यांच्या कामांचा @dhananjay_munde साहेबांच्या हस्ते भव्य शुभारंभ! pic.twitter.com/S5rLgn9Rnw
— OfficeofDM (@OfficeofDM) July 21, 2021
सामाजिक न्याय विभागाचे शिक्षक देताहेत पालावर जाऊन ज्ञानाचे धडे
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीड पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून बीड जिल्हा सामाजिक न्याय विभागाकडून एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबला जात आहे. पालावर राहणाऱ्या, वीट भट्टीवर काम करणाऱ्या, भिक्षा मागणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी ‘मिशन डायरेक्ट ऍडमिशन’ ही संकल्पना राबवून, यांतर्गत हजारो मुलांना समाज कल्याण विभागाच्या आश्रम शाळांमध्ये मोफत प्रवेश दिले आहेत. सध्या ऑनलाईन शिक्षणाची या मुलांकडे सोय होऊ शकत नाही. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या शाळेतील शिक्षक थेट या पालांवर जाऊन या बालकांना शालेय शिक्षण देत आहेत.
पाल, वीट भट्टी, आदी ठिकाणी जाऊन कोणत्याही भिंती, शाळा हे बंधन तोडून ही मुले जागा मिळेल तिथे, अगदी मंदिरात, खुल्या मैदानात शिक्षण घेत आहेत. धनंजय मुंडे यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्यासह सर्व शिक्षकांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
इतर बातम्या :
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पंकजा मुंडेंच्या भेटीला, मुंडेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न?
राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोमात, राज्यात सध्या असे दुर्दैवी चित्र : आशिष शेलार
Grand Yatri Niwas will be set up at Vaidyanath Temple in Parli