शरद पवारांचे माजी मंत्री अजित पवार गटात जाणार? शिवसेनेचे बडे नेते म्हणाले, पक्ष बदलानंतरही आम्ही सोडणार नाही?
Gulabrao Patil and Gulabrao Deokar: अटलांटा घोटाळा आहे. घरकुल घोटाळ्यात झालेली शिक्षा आहे. आता अजून त्यांची ही सर्व प्रकरणे बाहेर येतील. या सर्वांमध्ये त्यांचे हात बरबटलेले आहे. त्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी ते कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही काही त्यांना सोडणार नाही, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
Gulabrao Patil and Gulabrao Deokar: जळगाव जिल्ह्यात दोन गुलाबमधील द्वंदाची चर्चा अधूमधून होत असते. शिवसेनेचे बडे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे राजकीय शत्रूत्व चर्चेत असते. दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीणमधून समोरासमोर लढले होते. त्यात गुलाबराव पाटील यांचा विजय झाला. गुलाबराव देवकर पराभूत झाल्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, ते कोणत्याही पक्षात गेले तरी आम्ही त्यांना सोडणार नाही.
काय म्हणाले गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील म्हणाले, जिल्हा बँक, मजूर फेडरेशन, अटलांटा या घोटाळ्यांमध्ये अडकू नये, स्वतःच्या बचावासाठी गुलाबराव देवकर कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही काही त्यांना सोडणार नाही. मी त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे, अशी थेट धमकी वजा इशारा माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांना दिला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांच्या अजित पवार गटातील प्रवेशावर बोलताना शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, गुलाबराव देवकर यांना पक्ष बदलाची काय घाई झाली आहे. लगेच आठ दिवसांमध्ये या माणसाला पळावे लागत आहे. कारण त्यांनी जिल्हा बँकेत घोटाळा केला आहे. मजूर फेडरेशनचा दहा कोटींचा विषय आहे.
अटलांटा घोटाळा आहे. घरकुल घोटाळ्यात झालेली शिक्षा आहे. आता अजून त्यांची ही सर्व प्रकरणे बाहेर येतील. या सर्वांमध्ये त्यांचे हात बरबटलेले आहे. त्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी ते कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही काही त्यांना सोडणार नाही, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
जळगाव ग्रामीण मतदार संघातून गुलाबराव पाटील पाच वेळा निवडून आले. ते महायुती सरकारमध्ये राज्याचे पाणीपुरवठा मंत्री होते. आता पुन्हा त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे गुलाबराव देवकर हे सुद्धा राज्यमंत्री राहिले आहेत.