त्या सर्व अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या? सोमनाथ सूर्यवंशींच्या आईची शरद पवारांकडे आर्त हाक

Sharad Pawar on somnath suryawanshi: सोमनाथ यांचा लहान भावाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे सांगितले ते खोटे असल्याचा दावा केला. सोमनाथ सूर्यवंशी यांनी कोणत्याही पोलिसांना मारहाण केली नाही. तो आंदोलनात नव्हता. त्यासंदर्भातील व्हिडिओ असेल तर तो माध्यमांकडे उघड करा

त्या सर्व अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या? सोमनाथ सूर्यवंशींच्या आईची शरद पवारांकडे आर्त हाक
somnath suryawanshi. Sharad Pawar
Follow us
| Updated on: Dec 21, 2024 | 2:36 PM

परभणीत पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. त्या प्रकरणावरुन सरकारला विरोधकांनी धारेवर धरले आहे. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार परभणीत पोहचले. त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या. यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने शरद पवार यांनी सांगितले, मुलाला अटक केल्याचे मला पोलिसांनी सांगितले नाही. चार दिवस तो पोलीस कोठडीत होतो. त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. त्याला पोलीस जबाबदार आहे. त्यामुळे त्या दिवशी पोलीस ठाण्यात कामावर असलेल्या सर्व दहा ते पंधरा जणांना सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरुन फाशीची शिक्षा द्या, असे त्यांना सांगितले.

वेगळ्या कोठडीत नेऊन मारहाण

सोमनाथ सूर्यवंशी याचा लहान भाऊ म्हणाला, माझ्या भावाच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम झाल्यानंतर आम्हाला त्याचे पार्थिव देण्यात आले. त्यावेळी त्यांच्या मृतदेहावर एकही कापड नव्हते. त्यांना कोणाताही आजार नव्हता. पोलीस कोठडीत त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांना वेगळ्या कोठडीत नेऊन मारहाण करण्यात आली. त्यांच्या मृतदेहावर मारहाण केल्याच्या अनेक जखमा होत्या. जे माझ्या भावासोबत घडले ते दुसऱ्या कोणाबद्दल घडू नये.

फडणवीस यांची माहिती खोटी

सोमनाथ यांचा लहान भावाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे सांगितले ते खोटे असल्याचा दावा केला. सोमनाथ सूर्यवंशी यांनी कोणत्याही पोलिसांना मारहाण केली नाही. तो आंदोलनात नव्हता. त्यासंदर्भातील व्हिडिओ असेल तर तो माध्यमांकडे उघड करा, असे आव्हान सोमनाथ सूर्यवंशी यांच्या भावाने केले. फडणवीस साहेबांनी जी मदत जाहीर केली ते आम्हाला मान्य नाही, असे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

कुटुंबाची म्हणणे ऐकल्यानंतर शरद पवार म्हणाले, कुटुंबाची भूमिका काय हे जाणून घेतल्यानंतर सरकारशी मला बोलता येईल. त्यासाठीत मी आलो आहे. घडलेली घटना गंभीर आहे. राज्य सरकारपर्यंत तुमच्या भावाना मांडू. दोषींवर कठोर कारवाई करण्याची कुटुंबाची मागणी मी सरकारकडे मांडेल, असे शरद पवार यांनी म्हटले. पोलिस अत्याचारमध्ये मुलगा जाणे हे दुःख कमी नाही, असा दिलासा शरद पवार यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दिला.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.