संतापजनक VIDEO, सासरच्या घरुन नववधूला नेले फरफटत, आंतरजातीय विवाहाला विरोध असलेल्या आई-वडिलांचे भयंकर कृत्य

घरात आल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी अक्षरश: तिला फरफटत घराबाहेर काढत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसते आहे. ही तरुणी जाण्यासाठी तयार नव्हती, मात्र जबरदस्तीने तिला ओढत घराबाहेर काढले, यात ती तरुणी घरासमोरच्या पायऱ्यांवरुन पडली, मात्र तरीही माहेरच्या माणसांना तिची दया आलेली दिसत नाही. या घटनेनंतर तिथे एकच आरडाओरड सुरु झाली. सासरच्या घरातली मंडळीही घडलेल्या या प्रकाराने गांगरुन गेली. मात्र तेवढ्या वेळात या तरुणीच्या माहेरच्या मंडळींनी या तरुणीला घेऊन तिथून पळ काढला.

संतापजनक VIDEO, सासरच्या घरुन नववधूला नेले फरफटत, आंतरजातीय विवाहाला विरोध असलेल्या आई-वडिलांचे भयंकर कृत्य
Amravati harassments videoImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 6:17 PM

अमरावती आंतरताजीय प्रेमविवाह (love marriage)केला म्हणून संतापलेल्या आई वडिलांनी, सासरच्या घरात जाऊन आपल्या मुलीला फरफटत घराबाहेर काढले आणि रस्त्यावरुन ओढत घरी नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात अंबाडा गावात हा प्रकार घडलाय. मुलीच्या सासरी जाऊन केलेल्या या कृत्याचा व्हिडीओही (video) समोर आला आहे. भर दिवसा सासरी मुलगी असताना, तिचे आईवडील घरात आले आणि त्यांनी आरडाओरड करत तिला फरफटत घराबाहेर आणले. आंतरजातीय विवाहाला आजही ग्रामीण भागात किती टोकापर्यंत विरोध होऊ शकतो, याचे हे कृत्य एक मोठे उदाहरण आहे.

काय आहे व्हिडिओत

हे सुद्धा वाचा

एकमेकांवर प्रेम असलेल्या तरुणतरुणीने 28 एप्रिलला आर्य समाज मंडळात विवाह केला होता. या लग्नाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. मुलगी लग्न होऊन सासरी आल्यानंतर 4 मे रोजी तिच्या माहेरची मंडळी सासरी दाखल झाली. यातल्या काही जणांनी आपले तोंड झाकून घेतल्याचेही या व्हिडीओत दिसते आहे. घरात आल्यानंतर तिच्या आईवडिलांनी अक्षरश: तिला फरफटत घराबाहेर काढत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसते आहे. ही तरुणी जाण्यासाठी तयार नव्हती, मात्र जबरदस्तीने तिला ओढत घराबाहेर काढले, यात ती तरुणी घरासमोरच्या पायऱ्यांवरुन पडली, मात्र तरीही माहेरच्या माणसांना तिची दया आलेली दिसत नाही. या घटनेनंतर तिथे एकच आरडाओरड सुरु झाली. सासरच्या घरातली मंडळीही घडलेल्या या प्रकाराने गांगरुन गेली. मात्र तेवढ्या वेळात या तरुणीच्या माहेरच्या मंडळींनी या तरुणीला घेऊन  तिथून पळ काढला. लग्न घरात असलेल्या मुली, महिलांचा आरडाओरडा, भीतीही या व्हिडीओतून स्पष्ट जाणवते आहे. सासरच्यांनी तिला सोडवण्यासाठी मागे धाव घेतली खर, मात्र त्यात ते यशस्वी होऊ ठकले नाहीत.

पाहा या घटनेचा व्हिडीओ

तरुणाचे कुटुंबीय चिंतेत

आपल्या घरात नुकत्याच आलेल्या तरुणीला असे उचलून नेल्याने, थोड्याच वेळात लग्न घरावर शोककळा पसरली. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. मात्र पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली नसल्याचा मुलांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.

चौकशी करुन कारवाई करणारपोलीस

या तरुणीला फरफटत नेण्याचा प्रकार सुरु असताना, घराच्या शेजारी असणाऱ्या एका मुलीने हा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केल्याचे व्हिडिओ पाहिल्यावर दिसते आहे. ४ मेच्या घटनेचा व्हिडीओ आता समोर आल्याने पोलिसांना आता या प्रकरणी कारवाई करावी लागणार आहे. आता या मुलीची चौकशी करुन पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.