चर्चा तर होणारचः कट्टर राणे समर्थक अन् माजी झेडपी सदस्या आनंदी परब सहकुटुंब शिवसेनेत; जिल्हा बँकेची उमेदवारीही घोषित
कट्टर राणे समर्थक म्हणून परिचित असणाऱ्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आनंदी परब यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हा जबर धक्का असल्याचे समजते.
सिंधुदुर्गः कट्टर राणे समर्थक म्हणून परिचित असणाऱ्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आनंदी परब यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हा जबर धक्का असल्याचे समजते. भाजपकडून उमेदवारी नाकारल्यामुळे परब कुटुंबीय नाराज होते. त्यामुळे त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.
का होते नाराज?
खरे तर आनंदी परब यांचे चिरंजीव विद्याधर यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे परब कुटुंबीय नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपची साथ सोडत सावंतवाडीचे आमदार आणि माजी अर्थ आणि गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आनंदी परब यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
उमेदवारी घोषित
कट्टर राणे समर्थक अशी आनंदी परब यांची ओळख आहे. त्यांनी कुटुंबासमवेत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेचे बळ नक्की वाढणार आहे. विशेष म्हणजे या पक्षप्रवेशावेळी आनंदीबाई यांचे पुत्र विद्याधर परब यांना शेती संस्था गटातून जिल्हा बँकेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. याबाबतची अधिकृत घोषणा आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे.
या साऱ्यांनी केला प्रवेश
तळवडेमधील जिल्हा परिषद माजी सदस्य आनंदी परब, रवींद्रनाथ परब, विद्याधर परब, जालिंदर परब, महेश परब, अभिजीत परब, जयराम परब, विक्रम परब, मनीष परब यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत आणि राजकारणातही शिवसेनेचे वर्चस्व वाढणार आहे. शिवसेनेने नाराजांना आपल्या गोटात ओढायला सुरुवात केली आहे.
ठाकूर राहणार प्रचार प्रमुख
सावंतवाडी जिल्हा बँकेच्या सावंतवाडी तालुका सहकार मतदार संघातून उमेदवारीसाठी शिवसेनेकडून सखाराम उर्फ बाबल ठाकूर तसेच अपक्ष उमेदवार डी. बी. वारंग इच्छुक होते. आता भाजपाच्या विद्याधर परब यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांना आ. केसरकर यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. सोबतच आता बाबल ठाकूर यांच्यावर प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी दिली. जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष डी. बी. वारंग यांनी देखील शिवबंधन बांधले. हा पक्ष प्रवेश नारायण राणे यांना धक्का मानला जात आहे.
इतर बातम्याः
उद्योगनगरी औरंगाबादचे घवघवीत यश, निर्यात करणाऱ्या देशातील टॉप 30 जिल्ह्यांत नंबर लावला!!