AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाची वाट बघतोय, अन्यथा लवकरच…”

यावेळी त्यांनी शरद पवारांशी कोणत्या विषयांवर चर्चा झाली? भाजपला सोडचिठ्ठी देणार का? आगामी निवडणूक लढवणार का? यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाची वाट बघतोय, अन्यथा लवकरच...
Harshvardhan Patil
Follow us
| Updated on: Aug 27, 2024 | 3:45 PM

Harshvardhan Patil Reaction On Sharad Pawar : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता अनेक नेते, आमदार आणि काही कार्यकर्ते पक्ष बदल करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या सत्ताधाऱ्यांसोबत विरोधी पक्षांमध्येही इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे. त्यातच आता राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी नुकतंच राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माझी शरद पवारांशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. देवेंद्र फडणवीस याबद्दल कधी निर्णय घेतात, याची मी वाट पाहत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.

शरद पवार यांची वसंत दादा शुगर इन्स्टिट्युटमधील बैठक संपल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. यामुळे हर्षवर्धन पाटील हे भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी होणार असल्याचे बोललं जात आहे. जवळपास दोन-अडीच तास हे दोन्हीही नेते चर्चा करत होते. यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवारांशी कोणत्या विषयांवर चर्चा झाली? भाजपला सोडचिठ्ठी देणार का? आगामी निवडणूक लढवणार का? यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

“कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही”

“गेल्या अनेक दिवसांपासून मी शरद पवारांची भेट घेण्यासाठी वेळ मागत होतो. त्यानुसार त्यांनी मला आज भेटण्यासाठी वेळ दिली. यावेळी शरद पवारांशी वसंत दादा शुगर इन्स्टिट्युटमधील काही विषयांवर चर्चा झाली. ही इन्सिटट्युट शेतकऱ्यांसाठी काम करते. या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत. अनेक विषय होते. निवडणुका असल्याने काही विषय रखडले होते, त्यावर चर्चा झाली. वसंत दादा शुगर इन्स्टिट्युटने महाराष्ट्रात काही जागा घेतल्या आहेत. त्या जागांवर शेतकऱ्यांसाठी विविध संशोधन सुरु आहेत. त्यावर काही चर्चा करायची होती. या बैठकीत शरद पवारांशी याच मुद्द्यांवर चर्चा केली. शरद पवार आणि माझी अडीच-तीन तास बैठक सुरु होती. पण यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. त्याबद्दल माझ्याशीही कोणीही बोललं नाही”, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

“फडणवीसांच्या निर्णयाची वाट बघतोय”

चंद्रशेखर बावनकुळे हे ज्येष्ठ नेते आहेत. ते काय बोलले, हे मला माहीत नाही. मी कोणाला भेटलो नाही आणि मला कोणीही बोललं नाही. अजित पवारांच्या दौऱ्यात अशा चर्चा सुरु आहेत की जो सीटिंग आमदार आहे त्याला तिकीट दिले जाईल. त्यामुळे आमच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह आहे की मी निवडणूक लढवावी. लोकसभेला अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल चर्चा झाली होती. त्यावेळी असं ठरलं होतं अजित पवार म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस इंदापूरबद्दल जो निर्णय घेतील तो निर्णय मी मान्य करेन. मलाही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मी लवकरच याबद्दलचा निर्णय घेईन. त्यामुळे फडणवीस याबद्दल कधी निर्णय घेतात, याची मी वाट पाहत आहे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.

“अद्याप जागावाटपाचा निर्णय झालेला नाही”

तीन आठवड्यांपूर्वी मी देवेंद्र फडणवीसांशी बोललो होतो. त्यावेळी त्यांनी मला मी लवकरच याबद्दलचा निर्णय घेईन, असे सांगितले होते. मी कायमच ग्राऊंड लेवला काम करत असतो. त्यामुळे फडणवीस काय निर्णय घेतात ते बघू. सध्या सर्वच ठिकाणी बॅनरबाजी सुरु आहे. हे बॅनर कोण लावतं याची मला माहिती नाही. पण हा लोकांचा अधिकार असतो. शेवटी जनता महत्त्वाची. जनतेचा आग्रह असतो. मी माझं म्हणण पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत सांगितले आहे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी जागावाटपाबद्दलही भाष्य केले. महायुतीचा आतापर्यंत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. वरिष्ठ पातळीवरील समितीत माझा समावेश नाही. त्यामुळे मला त्याबद्दल काहीही माहिती नाही. महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय एक पक्ष घेणार नाही. हा निर्णय तिन्ही पक्ष मिळून घेणार आहेत. अद्याप जागावाटपाचा निर्णय झालेला नाही. इंदापुरात मी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. हा कार्यकर्त्यांचा आवाज वरिष्ठ नेत्यांपर्यंत गेला आहे. त्यामुळे त्यांनी याबद्दल योग्य तो निर्णय घ्यावा, असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...