Obc reservation : फडणवीस, पंकजा मुंडेंनी केंद्राला पत्रं पाठवली मग कोणत्या अधिकाराने भाजप बोलतंय?-हसन मुश्रीफ
देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी केंद्राला ओबीसी डेटासंदर्भात पत्र पाठवली होती. मग कोणत्या आधारे केंद्र शासनाकडून डाटा मागणे चुकीचा आहे, असे भाजप म्हणत आहे. अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
कोल्हापूर : राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असताना महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. इंपेरिकल डेटावरून दोन्हीकडून टोलवाटोलवी सुरू आहे. यावरूनच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे. भाजप जे महाविकास आघाडीवर आरोप करत आहे, त्यात कोणतीही वस्तुस्थिती नाही असेही मुश्रीफ म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस,पंकजा मुंडेंची केंद्राला पत्रं
2011 ला जातिनिहाय जनगणना झाली असताना त्यांनी डेटा उपलब्ध करून दिला नाही, यासाठी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी केंद्राला यासंदर्भात पत्र पाठवली होती. मग कोणत्या आधारे केंद्र शासनाकडून डाटा मागणे चुकीचा आहे, असे भाजप म्हणत आहे. अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे. आता भाजप महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षण घालवल्याचा आरोप करत आहे, त्यात कुठलीही वस्तुस्थिती नाही असेही मुश्रीफ म्हणाले आहेत. त्यामुळे मुश्रीफांच्या या दाव्याने नवे ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजपने पडळकरांना आवरले पाहिजे
भारतीय जनता पक्षाने गोपीचंद पडळकर यांना आवरले पाहिजे, अशा वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आमदार झालो म्हणजे असं बोलण्याचं लायसन मिळाले असे समजण्याची गरज नाही, अशी टीका मुश्रीफ यांनी पडळकरांवर केली आहे. तसेच पडळकरांनी बोलताना भान राखण्याची गरज आहे. अशा लोकांमुळे आपल्या पक्षाची पातळी घसरत चालली आहे हे भाजप ने ओळखण्याची गरज आहे, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. त्यामुळे आता गोपीचंद पडळकर मुश्रीफांना जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थातील आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला अध्यादेश रद्द करत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला झटका दिल्यानंतर हा वाद पेटला आहे. ओबीसी आरक्षणासाठी अनेक ओबीसी संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला आहे.