12 तासांचं धाडसत्र, घरात काय-काय घडलं? कुठले प्रश्न विचारले? हसन मुश्रीफ यांच्या मुलाने सांगितली सर्व हकीकत

"जोपर्यंत सर्वसामान्य जनता आमच्यासोबत आहे तोपर्यंत आमच्या केसालाही धक्का लागणार नाही", असं नाविद यावेळी ठामपणाने म्हणाले.

12 तासांचं धाडसत्र, घरात काय-काय घडलं? कुठले प्रश्न विचारले? हसन मुश्रीफ यांच्या मुलाने सांगितली सर्व हकीकत
हसन मुश्रीफImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 7:49 PM

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरी आज सकाळी सात वाजता ईडी अधिकारी दाखल झाले होते. तेव्हापासून ईडी अधिकाऱ्यांकडून मुश्रीफ कुटुंबियांची चौकशी सुरु होती. ईडी अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्या पुण्यातील कंपनीत देखील धाड टाकली. अतिशय वेगाने सगळ्या घडामोडी सुरु होत्या. गेल्या बारा तासांपासून ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु होती. अखेर बारा तासांनंतर ईडी अधिकारी मुश्रीफ यांच्या कागल (Kagal) येथील घराबाहेर पडले आहेत. ईडी अधिकारी गेल्यानंतर हसन मुश्रीफ यांचा मुलगा नाविद मुश्रीफ (Navid Mushrif) यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी घरात सकाळपासून काय-काय घडलं याची माहिती दिली.

“आम्ही चौकशीला संपूर्ण सहकार्य केलं. त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तर दिलंय. सकाळपासून जी कार्यकर्ते थांबली आहेत त्यांचे आभार मानतो. चौकशीला आम्ही उत्तर दिलेलं आहे”, असं नाविद मुश्रीफ यांनी सांगितलं.

“हे तर राजकीय होतं. तुम्हाला सगळं माहिती आहे. त्यांना वेळोवेळी प्रश्न विचारले. त्याला आम्ही सक्षमपणे उत्तर दिले. सकाळी सात वाजता आले होते. साहेबांशी बोलणं झालेलं नाही”, अशी माहिती त्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

“जोपर्यंत सर्वसामान्य जनता आमच्यासोबत आहे तोपर्यंत आमच्या केसालाही धक्का लागणार नाही”, असं नाविद यावेळी ठामपणाने म्हणाले.

“अधिकारी त्यांचे काम करत होते. त्यांना वरुन फोन येत होते. त्या पद्धतीने ते काम करत होते. जनता त्यांना योग्यवेळी उत्तर देईल. आमच्या कार्यकर्त्यांना ते चार दिवसांपासून सांगत होते. काहीतरी होईल, असं बोलत होते. वरचे कोण आहेत ते नेमकं माहिती नाही”, असं नाविद म्हणाले.

सलग बारा तासांपासून चौकशी सुरु असताना आज संध्याकाली ईडीचा आणखी एक अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या घरी दाखल झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मुश्रीफ कुटुंबियांची चौकशी आणखी किती वेळ चालणार हे अस्पष्ट होतं. ईडीच्या अधिकाऱ्यांची सकाळी सात वाजेपासून कारवाई सुरु केली होती.

ईडी अधिकाऱ्यांनी आज हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील ब्रिस्क कंपनीत देखील धाड टाकली. अखेर अनेक तासांच्या चौकशीनंतर आता संध्याकाळी ईडी अधिकारी कंपनीच्या बाहेर पडताना दिसले. पण हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची चौकशी सुरुच होती.

ईडीचा आणखी एक अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या घरात जाताना दिसला होता. त्यामुळे मुश्रीफ कुटुंबियांची चौकशी आणखी वेळ चालेल? याबाबत काही अस्पष्टता होती. अखेर संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास ईडी अधिकारी मुश्रीफांच्या घराबाहेर पडले.

दुसरीकडे हसन मुश्रीफ यांच्याविरोधात सुरु असलेल्या कारवाईमुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. ईडी अधिकारी गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी नाविद यांना उचलून आनंद साजरा केला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.