मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करणार : राजेश टोपे
मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करुनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल, असं ट्वीट राजेश टोपे यांनी केलं आहे. (Rajesh Tope on strict conditions for Wine shops during corona lockdown)
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात मद्यविक्री बंद असल्याने अनेक तळीरामांना चुटपूट लागून राहिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Rajesh Tope on strict conditions for Wine shops during corona lockdown)
‘लॉकडाऊनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला, तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करुनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल.’ असं ट्वीट राजेश टोपे यांनी केलं आहे. त्यामुळे मेघालय आणि आसाम या राज्यांप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करुन महाराष्ट्रात काही ठिकाणी मद्यविक्रीची दुकानं काही अटींसह सुरु होणार, की तूर्तास ती बंदच राहणार, याकडे तळीरामांचे डोळे लागले आहेत.
लॉकडावूनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल.#CoronaVirusUpdate
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 20, 2020
राज्यात कालपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. 3 मेपर्यंत देशात असलेल्या लॉकडाऊनचं काळात नागरिकांनी घरीच थांबायचे आहे. मात्र शेती, आरोग्य, बांधकाम याच्याशी निगडीत काही उद्योगांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. (Rajesh Tope on strict conditions for Wine shops during corona lockdown)
लॉकडाऊनच्या काळात मद्य विक्रीची दुकानं बंद असल्याने देशभरातील तळीरामांना चुटपूट लागून राहिली आहे. तूर्तास दोन राज्यांच्या शासनाने थोडा काळ मद्यविक्री करण्यास परवानगी दिली आहे. आसाम आणि मेघालय या दोन राज्यात सात तासांसाठी मद्यविक्री सुरु झाली आहे. आसाममध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत, तर मेघालयमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कोणते नियम बंधनकारक?
मेघालय आणि आसाम या राज्यांमध्ये मद्य दुकानदारांना कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश आहेत. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणेही बंधनकारक आहे. त्यानुसार बहुतांश दुकानासमोर खडूने गोल आखले जात आहेत. मद्य खरेदीसाठी आलेले ग्राहकही शिस्तीत रांगेत उभं राहणं अपेक्षित आहे.
हेही वाचा : ‘या’ राज्यांमध्ये मद्यविक्री पुन्हा सुरु, तळीरामांच्या रांगाही लागल्या
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. जवळपास महिनाभर मद्यविक्रीची दुकानं बंद राहिल्याने मद्यप्रेमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने ती पुन्हा सुरु करण्याची मागणी करत आहेत.
With priority to Irrigation & Water conservation works,MNREGA & other construction works are allowed to resume after April 20. सिंचन, जलसंवर्धनाच्या कामांना प्राधान्य देत मनरेगाची कामे तसेच बांधकामाच्या कामांना २० एप्रिलनंतर परवानगी.#MaharashtraLockdown#MaharashtraAgainstCorona pic.twitter.com/sBvI6ajjo8
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 20, 2020
(Rajesh Tope on strict conditions for Wine shops during corona lockdown)